भागवत धर्म प्रसारक समितीच्या वतीने नीलकंठ शिंदे सर यांचा सत्कार.
सायकल यात्रेमुळे भारतातील अध्यात्म कार्याला उजाळा :-डॉ राहुल जवंजाळ
सांगोला (प्रतिनिधी)आजच्या धक्काधकिच्या जीवनात सायकल यात्रा ही अभिनव संकल्पना असून त्यामुळे या सायकलपटूंना उत्तर भारतातील अध्यात्म व पर्यटन जवळून पाहून संतांच्या कार्याला उजाळा मिळाल्याचे सहारा इन्स्टिट्यूट चे अध्यक्ष राहुल जवंजाळ सर यांनी व्यक्त केले.
भागवत धर्म प्रसारक समिती ,पालखी सोहळा पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या नीलकंठ शिंदे सर यांचा सत्कार समारंभ वेळापूर येथील आनंदमूर्ती सत्संग भवन कार्यालयात आयोजित करण्यात आला होता .
यावेळी निळकंठ शिंदे सर यांनी संपूर्ण उत्तर भारत सायकल यात्रेत आलेले अनुभव सांगितले व हि यात्रा पूर्ण करण्यासाठी अध्यात्माचि फार मोठी जोड मिळाल्याचे आवर्जून सांगितले . यावेळी भागवत धर्म प्रसारक समितीचे अध्यक्ष सूर्यकांत भिसे ,डॉ. राहुल जवंजाळ, पंचायत समिती सदस्य हेमलता चांडोले या सर्व मान्यवरांनी नीलकंठ शिंदे सर यांचा विठ्ठल -रुक्मिणी -नामदेव यांची प्रतिमा ,शाल ,श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला .
कार्यक्रमाचे प्रास्ताविकात सूर्यकांत भिसे सर यांनी सायकल यात्रेची माहिती देऊन संतांचे चमत्कार पाहण्यापेक्षा त्यांनी सांगितलेली अध्यात्म भक्ती तसेच त्यांनी दिलेला शांती, समता ,बंधुता हा संदेश घरोघरी पोहोचविने हा आमचा उद्देश होता असे त्यांनी सांगितले . यावेळी भागवत धर्म प्रसारक समितीचे सदस्य व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments