google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 धक्कादायक ! स्टेट बँकेच्या मॅनेजर ची गळा चिरून हत्या ; 30 किलोमीटर दूर रक्ताच्या थारोळ्यात आढळला मृतदेह

Breaking News

धक्कादायक ! स्टेट बँकेच्या मॅनेजर ची गळा चिरून हत्या ; 30 किलोमीटर दूर रक्ताच्या थारोळ्यात आढळला मृतदेह

 धक्कादायक ! स्टेट बँकेच्या मॅनेजर ची गळा चिरून हत्या ; 30 किलोमीटर दूर रक्ताच्या थारोळ्यात आढळला मृतदेह

बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यात आज सकाळच्या सुमार भारतीय स्टेट बँकेच्या हिरडव शाखेचे 37 वर्षीय व्यवस्थापका चा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळल्याने एकच खळबळ उडाली विशेष बाब म्हणजे त्यांचा खून ३० किलोमीटर अंतरावर मेहकर तालुक्यात झाला. खुनी व खुनाचे कारण शोधण्याचे पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे.

घटनास्थळी आढळलेला मृतदेह

भारतीय स्टेट बँकेच्या हिरडव शाखेचे व्यवस्थापक व मूळ वाशी नवी मुंबईचे रहिवाशी असलेले उत्कर्ष एकनाथ पाटील वय ३७ वर्षे यांचा खून करण्यात आला 

असून त्यांचा मृतदेह मेहकर तालुक्यातील सारंगपूर शिवारातील शेतात आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. उत्कर्ष पाटील यांना स्टेट बँकेने व्यवस्थापक पदाचा परिविक्षा कालावधी पूर्ण करण्यासाठी बुलढाणा, जानेफळ, हिवरा आश्रम आणि सध्या लोणार तालुक्यातील हिरडव येथे नियुक्ती दिली होती. 

उत्कर्ष पाटील यांना स्टेट बँकेने व्यवस्थापक पदाचा परिविक्षा कालावधी पूर्ण करण्यासाठी बुलढाणा, जानेफळ, हिवरा आश्रम आणि सध्या लोणार तालुक्यातील हिरडव येथे नियुक्ती दिली होती. जिल्ह्यात येऊन त्यांना केवळ ५ महिन्यांचा कालावधी झाला होता.

 तत्पूर्वी त्यांनी ८ वर्षे मुंबई विभागात स्टेट बँकेत काम केले होते. इंजिनिअरिंगची पदवी व एम. बी. ए. झालेले उत्कर्ष पाटील हे उच्चशिक्षित आणि कामात प्रवीण होते, असे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले. त्यांना १० महिन्याचा एक मुलगा आहे. कुटुंबीय मुंबईत रहात होते तर ते एकटेच बुलढाणा जिल्ह्यात रहात होते.

मुंबई भागात नेमणूक मिळत नसल्याने त्यांनी नोकरीचा राजीनामा बँकेकडे दिला होता. विशेष म्हणजे त्यांचा परिविक्षा कालावधी संपण्यास केवळ १३ दिवस शिल्लक असतांना त्यांची हत्या झाली. अतिशय शांत स्वभाव, ग्रामीण भागातील बँक ग्राहकांची कामे तत्परतेने करून देणारे असा त्यांचा स्वभाव असल्याचे हिरडव जानेफळ येथील नागरिकांनी सांगितले.

 अशा परिस्थितीत त्यांच खून कोणी व का केला असावा, असे पोलीस यंत्रणेला कोडे पडले आहे. जिल्ह्यात येऊन त्यांना केवळ ५ महिन्यांचा कालावधी झाला होता. विशेष म्हणजे त्यांचा परिविक्षा कालावधी संपण्यास केवळ १३ दिवस शिल्लक असतांना त्यांची हत्या झाली.

घटनास्थळी तोडून फेकलेला हात

काल १ जानेवारी रोजी रात्री सारंगपूर शिवारातील प्रकाश चौधरी व अशोक रिंढे या दोघांच्या शेताच्या मध्ये उत्कर्ष पाटील यांचा मृतदेह आढळून आल्याचे पोलिसांनी सांगितले.

 गळ्यावर चाकूने वार करून त्यांची हत्या करण्यात आहे तर शरीरापासून हात वेगळा करून तो देखील काही अंतरावर फेकण्यात आला होता. एवढ्या निर्दयतेने कोणी व का हत्या केली ते तपासा अंती निष्पन्न होईलच. या प्रकरणी मेहकर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक निर्मला परदेशी अधिक तपास करत आहेत.

उत्कर्ष पाटील यांची नेमणूक हिरडव येथे होती , मात्र त्यांचा खून ३० किलोमीटर अंतरावर मेहकर तालुक्यात झाला. खुनी व खुनाचे कारण शोधण्याचे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे. आज सकाळी उत्कर्ष पाटील यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

Post a Comment

0 Comments