google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 श्रद्धा वालकर या हिंदु युवतीची निर्घृण हत्या करणार्‍या क्रूर आफताबला तात्काळ फाशी देण्याच्या मागणीसाठी सकल हिंदू समाजाच्या वतीने गुरुवारी सांगोल्यात आक्रोश मोर्चा !

Breaking News

श्रद्धा वालकर या हिंदु युवतीची निर्घृण हत्या करणार्‍या क्रूर आफताबला तात्काळ फाशी देण्याच्या मागणीसाठी सकल हिंदू समाजाच्या वतीने गुरुवारी सांगोल्यात आक्रोश मोर्चा !

 श्रद्धा वालकर या हिंदु युवतीची निर्घृण हत्या करणार्‍या क्रूर आफताबला तात्काळ फाशी देण्याच्या मागणीसाठी

सकल हिंदू समाजाच्या वतीने गुरुवारी सांगोल्यात आक्रोश मोर्चा !

सांगोला तालुका प्रतिनिधी;    श्रद्धा वालकर या हिंदू युवतीच्या शरीराचे ३५ तुकडे करून निर्घृण हत्या करणार्‍या आफताबला तात्काळ फासावर लटकवावे. तसेच अशा घटना रोखण्यासाठी कठोर असा लव्ह जिहाद विरोधी कायदा  व धर्मांतर विरोधी कायदा करावा,

 या मागणीसाठी सकल हिंदू समाज सांगोला तालुक्याच्या वतीने येत्या गुरुवारी १५ डिसेंबर या दिवशी सकाळी ११:०० वाजता महात्मा फुले चौकापासून भव्य सकल हिंदू जन आक्रोश मोर्चा प्रारंभ होऊन पुढे शहरातील मुख्य रस्त्यावरून तहसील कार्यालयावर काढण्यात येणार आहे. 

या ठिकाणी मान्यवर वक्ते आपले विचार व्यक्त करणार आहेत. यावेळी सकल हिंदू समाजाच्या वतीने गृहमंत्री महाराष्ट्र राज्य व जिल्हाधिकारी सोलापूर यांच्या नावे निवेदन देण्यात येणार आहे.  या घटनेतून आफताबची क्रूरता आणि विकृत मानसिकता दिसून येते. 

या घटनेमुळे देशभरात तीव्र संतापाची लाट पसरली आहे. तरी अशा विकृत प्रवृत्तीवर वेळीच अंकुश आणण्यासाठी जात पक्ष संप्रदाय हे सर्व बाजूला सारून हिंदू म्हणून या मोर्चात सहभागी व्हावे असे आवाहन सकल हिंदू समाज सांगोला तालुक्याच्या वतीने करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments