सांगोला तालुक्यातील बुरंगेवाडीत घरास आग ३ लाखांच्या रोकडसह साहित्य खाक
सांगोला : पूर्व वैमनस्यातून शेजाऱ्याने घरास आग लावल्यामुळे घरातील रोख 3 लाख रुपयांसह दोन तोळे दागिने, संसारोपयोगी साहित्य, ज्वारी, बाजरी जनावरांची पेंड जळून खाक झाले. या घटनेत जवळपास ४ लाख ४७ हजार रुपयांचे नुकसान झाले.
ही घटना शनिवार मध्यरात्री एकच्या सुमारास सांगोला तालुक्यात बुरंगेवाडी येथे घडली. याबाबत, बिरा सावळा वगरे यांनी फिर्याद दिली असून, पोलिसांनी बिरा म्हाळू बुरंगे (रा. बुरंगेवाडी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.
फिर्यादी बिरा वगरे व बिरा बुरंगे दोघेजण बुरंगेवाडी- लोणविरे मार्गावरराहत होते. त्यांच्यात शेतीचा बांध फोडणे कारणावरून भांडण झाले होते.
त्यानंतर बिरा वगरे तेथून १ किमी अंतरावर आलदर वगरे वस्ती शाळेजवळ राहत होते. त्या ठिकाणी राहण्यास गेल्यानंतर बिरा बुरंगे यांनी पूर्वीच्या भांडणावरून बोरची केबल तोडून पाइपलाइन फोडणे, घरातील विद्युत पुरवठा तोडणे असेप्रकार चालू केले होते.
दरम्यान, शनिवार (१०) रोजी रात्री १च्या सुमारास बिरा वगरे व त्याची पत्नी मंगल यांनी जेवण आटोपून घरात झोपी गेले असताना अचानक रात्री ११च्या सुमारास पत्नी मंगल हिला झोपेतून जाग आली. त्यांना जुन्या राहत्या घरास आग लागल्याचे दिसून आल्याने तिने पतीला जागे केले.
0 Comments