google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला- जेवण वाढण्याच्या कारणावरून वाद; पत्नीची आत्महत्या

Breaking News

सांगोला- जेवण वाढण्याच्या कारणावरून वाद; पत्नीची आत्महत्या

सांगोला- जेवण वाढण्याच्या कारणावरून वाद; पत्नीची आत्महत्या

सांगोला पतीबरोबर जेवण वाढण्याच्या कारणावरून वाद झाल्याने पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केली. यानंतर घातपात झाल्याच्या संशयावरून सासू सामन्यांनी मिळून जावयास मारहाण केली. पती, सासू सासरे यांच्या . झालेल्या वादानंतरही सोमवारी रात्री उशिरापर्यंत आत्महत्या केलेल्या विवाहितेवर अंत्यसंस्कार झाले नव्हते. 

भाग्यश्री प्रसाद टकले (वय २२, चिचोली रोड, सांगोला ) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. ही घटना रविवार ११ डिसेंबर रोजी दुपारी दोनच्या सुमारास घडली. 

सांगोला चिंचोली रोड येथील भेळ विक्रेता प्रसाद टकले हा रविवारी दुपारी दोनच्या सुमारास जेवण करण्यासाठी घरी आला होता. यावेळी जेवण वाढण्यावरून पती पत्नीमध्ये वाद झाला. वादानंतर प्रसाद हे आई व त्यांची मुलगी दुर्गा असे तिघे जण भेळच्या गाड्यावर निघून गेले. 

यावेळी घरात कोणी नसताना भाग्यश्रीने साडीच्या साह्याने छताच्या पंख्याला गळफास घेतला. दरम्यान, सायंकाळी प्रसाद हे पाचच्या सुमारास तिघे जण दुचाकीवरून घरी परतले. त्यावेळी त्यांना त्यांच्या घराचा दरवाजा उघडा दिसला.

 तो घरात गेल्यानंतर त्याला पत्नी भाग्यश्री हिने बेडरूममधील छताच्या पंख्याला साडीने गळफास घेतल्याचे दिसून आले. पाहून जोराने आरडाओरडा करीत आईच्या मदतीने भाग्यश्री यांना खाली उतरून उपचाराकरता सांगोला येथील खासगी दवाखान्यात दाखल केले. पण उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले,

Post a Comment

0 Comments