मोठी बातमी ! जुन्या घराची खरेदी केल्यास त्या घराच वीज कनेक्शन आपोआप नवीन मालकाच्या नावावर होणार ; वाचा सविस्तर
मानवाच्या जीवनासाठी अन्न, वस्त्र, निवारा याव्यतिरिक्त आता विजेची देखील आवश्यकता आहे. विजेचा वापर दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे महावितरण कडून देखील ग्राहकांच्या सोयीसाठी कायमच वेगवेगळ्या योजना किंवा सोयीसुविधा पुरविल्या जात आहेत.
आता महावितरणने वीज ग्राहकांच्या सोयीसाठी एक भन्नाट सुविधा विकसित केली आहे. आतापर्यंत एखाद्या व्यक्तीने जुने घर किंवा दुकान खरेदी केले असल्यास त्या घराचं वीज कनेक्शन त्या व्यक्तीच्या नावावर होण्यासाठी महावितरण च्या पायऱ्या घासाव्या लागत.
यासाठी अनेक कागदपत्रांची जुळवाजुळव करत जुन्या मालकाच्या नावाचं वीज कनेक्शन नवीन मालकाच्या नावावर केल जात असे. मात्र आता महावितरण ने आपल्या ग्राहकांच्या सोयीसाठी जून घर किंवा दुकान खरेदी केलं असेल
तर त्या व्यक्तीच्या नावावर तेथील वीज कनेक्शन आपोआप जुडल जाईल अशी व्यवस्था विकसित केली आहे. यासाठी माहिती तंत्रज्ञानाचा वापर झाला आहे.खरं पाहता आत्तापर्यंत जून घर खरेदी केलं की जुन्या मालकाचे वीज कनेक्शन नवीन मालकाच्या नावावर करण्यासाठी महावितरणकडे स्वतंत्र अर्ज द्यावा लागत होता.
यासोबत काही कागदपत्रे द्यावी लागत होती. यानंतर प्रक्रिया शुल्क भरला जात असे आणि मग महावितरण कडून प्रत्यक्ष फिल्डवर जाऊन पाहणी होत असे. यासाठी ऑनलाईन सिस्टीम देखील विकसित झाली होती मात्र ही देखील वेळ खाऊ होती.
एकंदरीत आतापर्यंत जुन्या घराची वीज कनेक्शन नवीन मालकाच्या नावावर होण्यासाठी ऑनलाईन तसेच ऑफलाइन दोन्ही प्रक्रिया वेळखाऊ होत्या. यासाठी कागदपत्रांची जुळवाजुळ करणे हेतूदेखील ग्राहकांना अडचणीचा सामना करावा लागत असे. मात्र आता महावितरण ने विकसित केलेल्या नवीन सिस्टीम नुसार, मुद्रांक शुल्क व नोंदणी विभागाशी महावितरणची आयटी सिस्टीम जोडण्यात आली आहे.
आता या नवीन सिस्टीम अनुसार एखाद्या व्यक्तीने जुने घर खरेदी केले आणि त्याची नोंदणी विभागात नोंदणी झाली की विभागाकडून महावितरणला कळवलं जातं, हे सारं काम सिस्टीमच्या माध्यमातून ऑनलाइन होतं. यानंतर महावितरण कडून संबंधित ग्राहकाला एसएमएस दिला जातो आणि आवश्यक प्रक्रिया शुल्क भरण्यास सांगितले जाते.
हे शुल्क भरले की नवीन मालकाच्या नावावर वीज कनेक्शन ट्रान्सफर होते. म्हणजे हे शुल्क ऑनलाईन देखील भरले जाऊ शकते. वीज कनेक्शन नवीन मालकाच्या नावावर झाल्यानंतर लगेचच पुढच्या महिन्यापासून त्या मालकाच्या नावाने वीज बिल येते.
मानवाच्या जीवनासाठी अन्न, वस्त्र, निवारा याव्यतिरिक्त आता विजेची देखील आवश्यकता आहे. विजेचा वापर दिवसेंदिवस वाढत आहे. जर समजा एकापेक्षा अधिक व्यक्तींच्या नावाने जुन्या घराची खरेदी झाली असेल तर महावितरणला कोणत्या व्यक्तीच्या नावाने वीज कनेक्शन द्यायचे याबाबत कळवावे लागते.
विशेष म्हणजे या नवीन व्यवस्थेची महावितरण कडून यशस्वी चाचणी झाली आहे. या सिस्टीमची चाचपणी झाल्यामुळे आता या व्यवस्थेचा अंमल सुरू होणार आहे. निश्चितच यामुळे अनेकांना दिलासा मिळणार आहे.
0 Comments