google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 नाझरा विद्यामंदिर चे मुख्याध्यापक अमोल गायकवाड राज्यस्तरीय आदर्श मुख्याध्यापक पुरस्काराने सन्मानित

Breaking News

नाझरा विद्यामंदिर चे मुख्याध्यापक अमोल गायकवाड राज्यस्तरीय आदर्श मुख्याध्यापक पुरस्काराने सन्मानित

नाझरा विद्यामंदिर चे मुख्याध्यापक अमोल गायकवाड राज्यस्तरीय

आदर्श मुख्याध्यापक पुरस्काराने सन्मानित

नाझरा   :- क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त पुणे येथे आयोजित केलेल्या जगदीशब्द फाउंडेशन व परिवर्तन सामाजिक संस्था यांच्या वतीने  

नाझरा विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेजचे मुख्याध्यापक अमोल गायकवाड यांना महात्मा ज्योतिराव फुले आदर्श मुख्याध्यापक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर  त्यांच्या सौभाग्यवती स्मिता अमोल गायकवाड यांना सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका या पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

 माजी खासदार व स्वाभिमानी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी, सामाजिक कार्यकर्त्या दिशा शेख, पत्रकार श्रीरंग गायकवाड,तृप्ती देसाई, कवी नारायण सुमंत,जगदीश ओहोळ आदी मान्यवरांच्या उपस्थितीत मानपत्र,स्मृतीचिन्ह,शाल व पुष्पगुच्छ देऊन या उभयतांना सन्मानित करण्यात आले.

नाझरा विद्यामंदिर प्रशालेच्या वतीने हा पुरस्कार मिळाल्याबद्दल पर्यवेक्षक मधुकर धायगुडे यांच्या हस्ते अमोल गायकवाड  यांना सन्मानित करण्यात आले.सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रबुद्धचंद्र झपके,संस्था सचिव मल्लिकार्जुन घोंगडे,संस्था सहसचिव प्रशुद्धचंद्र झपके,संस्था कार्यकारणी सदस्य विश्वेश झपके, 

विद्यामंदिर परिवारातील सर्व प्रशासकीय अधिकारी, सर्व शिक्षकेतर कर्मचारी, सांगोला तालुक्यातील शिक्षण क्षेत्रात काम करणारे,राजकीय क्षेत्रात काम करणारे असंख्य मान्यवर यांनी मुख्याध्यापक अमोल गायकवाड व आदर्श शिक्षिका स्मिता गायकवाड यांचे पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन केले व पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments