google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 मुलाने केले वडिलांच्या मृतदेहाचे ३० तुकडे

Breaking News

मुलाने केले वडिलांच्या मृतदेहाचे ३० तुकडे

 मुलाने केले वडिलांच्या मृतदेहाचे ३० तुकडे

कर्नाटक - प्रियकराने प्रेयसीचे ३५ तुकडे केल्याची घटना ताजी असताना आता एका मुलाने वडिलांचे ३० तुकडे केल्याची खळबळजनक घटना कर्नाटक राज्यात घडली आहे. 

कर्नाटकातील बागलकोट जिल्ह्यात परशुराम नामक इसमाला दारूचे व्यसन होते, अनेकदा परशुराम दारू पिऊन घरी यायचा, ६ डिसेम्बरला परशुराम घरी मद्यधुंद अवस्थेत आला होता, त्यावेळी घरी २० वर्षीय विठ्ठल होता. परशुराम ने मुलगा विठ्ठल ला मारहाण केली,

 वडिलांच्या मारहाणीमुळे संतापलेल्या विठ्ठल ने वडिलांच्या डोक्यावर रॉड ने वार केला. डोक्यावर अचानक झालेल्या प्रहारामुळे परशुराम चा मृत्यू झाला. वडिलांच्या मृत्यूनंतर विठ्ठल घाबरला. त्यानंतर त्याने मृतदेह शेतातील बोअरवेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र मृतदेह बोअरवेलमध्ये ढकलू शकला नाही.  

मग विठ्ठलला आयडिया सुचली. त्याने धारदार हत्यार आणले आणि परशुरामच्या मृतदेहाचे तुकडे केले. मोठ्या मुश्किलीने त्याने वडिलांच्या मृतदेहाचे 30 तुकडे केले. मग मृतदेहाचे तुकडे शेतातील बोअरवेलमध्ये फेकले. 

मृतदेहाची विल्हेवाट लावल्यानंतर विठ्ठलने काही वेळ आराम केला आणि त्यानंतर तो फरार झाला. त्यानंतर शनिवारी तो घरी परतला. घरच्यांनी त्याच्याकडे वडिलांची चौकशी केली असता त्याने आपल्याला माहित नसल्याचे सांगितले.

घरच्यांनी पोलिसांना परशुराम गायब असल्याची माहिती दिली. यानंतर पोलिसांनी परशुरामचा शोध सुरु केला. मात्र त्याचा कुठेच पत्ता लागत नव्हता. तपासादरम्यान पोलिसांना परशुरामचा मुलगा विठ्ठलवर संशय येऊ लागला. यामुळे पोलिसांनी सोमवारी विठ्ठलला चौकशीसाठी ताब्यात घेतले.

सुरवातीला पोलीस चौकशीत विठ्ठल आपण निर्दोष असल्याचे पोलिसांना सांगत होता. मात्र पोलिसी खाक्या दाखवताच त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. यानंतर पोलिसांनी परशुरामचा मृतदेह टाकलेल्या ठिकाणी खोदकाम करुन मृतदेह ताब्यात घेतला. यानंतर पोलिसांनी तात्काळ विठ्ठलला अटक केली.

Post a Comment

0 Comments