google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 पुणे विभागात सोलापूर जिल्ह्याचा बोलबाला ; तब्बल बारा पुरस्कारांवर कोरले सोलापूर जिल्ह्याचे नाव

Breaking News

पुणे विभागात सोलापूर जिल्ह्याचा बोलबाला ; तब्बल बारा पुरस्कारांवर कोरले सोलापूर जिल्ह्याचे नाव

पुणे विभागात सोलापूर जिल्ह्याचा बोलबाला ; तब्बल बारा पुरस्कारांवर कोरले सोलापूर जिल्ह्याचे नाव

सोलापूर : महाआवास अभियान ग्रामीण अमृत महा आवास अभियान विभाग स्तरावरील उत्कृष्ट काम करणा-या संस्था / व्यक्तींना "महा आवास अभियान ग्रामीण" 

सन 2021-22 सालातील पुरस्कार देणे बाबतची  विभागस्तरीय अंमलबजावणी, सनियंत्रण व मूल्यमापन समितीची सभा दि. ०९-११-२०२२ रोजी संपन्न झाली. सदर सभेमध्ये पुणे विभागातून विभागस्तरावर निवड झालेल्या पुरस्कारांमध्ये सोलापूर जिल्ह्यास तब्बल बारा पुरस्कार जाहीर झाले

 असल्याबाबत जा.क्र. विकास/कार्या- १०/ विभाग पुरस्कार वितरण /कावि/२२ विभागीय आयुक्त कार्यालय (विकास शाखा), पुणे विभाग, पुणे दिनांक 2 डिसेंबर 2022 च्या पत्रान्वये विभागीय आयुक्त कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.

सोलापूर जिल्ह्याने प्राप्त केलेले पुरस्कार पुढीलप्रमाणे.

सर्वोत्कृष्ट जिल्हा पुरस्कार - 

सोलापूर द्वितीय

राज्य पुरस्कृत आवास योजना सर्वोत्कृष्ट तालुके

1- अक्कलकोट - प्रथम, 

2- सांगोला - द्वितीय 

3- माळशिरस - तृतीय 

प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत

1- निंबर्गी ता. दक्षिण सोलापूर - प्रथम

2- मंदृप ता. दक्षिण सोलापूर - तृतीय 

राज्य पुरस्कृत आवास योजना सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत

1- भंडारकवठे ता. दक्षिण सोलापूर - तृतीय

शासकीय जागा उपलब्धता सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारे तालुके

प्रधानमंत्री आवास योजना

1- माळशिरस - प्रथम 

वाळू उपलब्धता सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारे तालुके

प्रधानमंत्री आवास योजना

1- अक्कलकोट - प्रथम

2- मोहोळ - द्वितीय 

वाळू उपलब्धता सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारे तालुके

राज्य पुरस्कृत आवास योजना

1- अक्कलकोट - प्रथम

2- मोहोळ - द्वितीय

पुरस्कार वितरण समारंभ दि.०७-१२-२०२२ रोजी सकाळी ११.३० वाजता झुंबर हॉल, मुख्य विभागीय आयुक्त कार्यालय, विधान भवन पुणे येथे होणार असून या प्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांचा सन्मान होणार आहे. 

त्याचप्रमाणे प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, संबंधित  तालूक्याचे तहसीलदार,गटविकास अधिकारी, संबंधित ग्रामपंचायतींचे सरपंच व ग्रामसेवक यांना निमंत्रित करण्यात आले आहे. महा आवास अभियानाच्या यशस्वीतेसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे.

 कोरोना कालावधीत सातत्याने व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे व नंतर बैठकांमधून नियमितपणे आढावा घेतला जात होता. कार्यक्षेत्र भेटी दरम्यान आवास योजनांचा प्राधान्याने आढावा घेण्यावर सीईओ स्वामी यांचा प्रयत्न यामुळे सफल झाला आहे.

महा आवास योजनेचा नियमितपणे आढावा घेतला जात होता. सोलापूर जिल्ह्यातील पक्की घरे नसलेल्या कुटुंबांना पक्की घरे देण्यात बऱ्याच प्रमाणात यश मिळाले याचा मनस्वी आनंद होतोय.

एखाद्याला हक्काचं घरकुल देणं ही बाब किती आनंददायी असते याची अनुभूती हे काम करीत असताना पदोपदी येत होती. परंतु प्रकल्प संचालक अर्जुन गुंडे, संतोष धोत्रे, सहाय्यक प्रकल्प अधिकारी उमेशचंद्र कुलकर्णी, गटविकास अधिकारी व कर्मचाऱ्यांचा हा खऱ्याअर्थाने सन्मान आहे.

दिलीप स्वामी 

मुख्य कार्यकारी अधिकारी

Post a Comment

0 Comments