आमदार शहाजीबापू पाटील साधणार उद्या दिव्यांगासोबत उद्या संवाद..!
सांगोला (तालुका प्रतिनिधी): मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राज्यात नव्यानेच देशातील पहिले दिव्यांग मंत्रालय साकार होत आहे.
या मंत्रालयाच्या माध्यमातूनच स्व.बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय मदत कक्षाचे राज्याचे ब्रँड ॲम्बेसेडर, प्रसिद्धीच्या झोतात असलेले आमदार शहाजीबापू पाटील हे राष्ट्रीय दिव्यांग दिनाचे औचित्य साधून दिव्यांगाशी संवाद साधून त्यांच्या अडचणी समस्या जाणून घेणार आहेत.
उद्या सांगोला येथील पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर सभागृहात दिव्यांगाचा सन्मान सोहळा आणि स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला असल्याची माहिती आमदार शहाजीबापू पाटील यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे
निसर्गाने आणि शरीराने आपल्यावर अनेक मर्यादा घालूनही आज आपण आयुष्याची लढाई निकराने आणि आत्मविश्वासाने लढत आहात त्याबद्दल सर्वप्रथम आपल्या जिद्दीला आणि प्रबळ इच्छाशक्तीला मनापासून सलाम.
निसर्गाने परिस्थितीने आपल्यावर कितीही मर्यादा किंवा बंधने लादली तरी जगण्याची आणि जिंकण्याची प्रबळ इच्छाशक्ती असेल तर आपला पराभव कुणीच करु शकत नाही हे मी आपल्याकडूनच शिकलो आहे.
माझ्या ३५ वर्षाच्या राजकीय कारकिदीत अनेकवेळा अपयश येऊनही पुन्हा आयुष्याशी आणि संकटांशी दोन हात करण्याची प्रेरणा मला खऱ्या अर्थाने आपल्याकडूनच मिळाली आहे. मतदारसंघातील दिव्यांग बांधव आणि भगिनींनी केलेल्या प्रेमामुळेच मी राजकीय लढाईत येणाऱ्या संकटांना जिद्दीने आणि धैर्याने तोंड देत आहे.
तुमच्यामुळेच मी तालुक्याचा आमदार आणि राज्याचा सेलिब्रिटी नेता झालो आहे. आपल्या सहकार्यामुळेच आज मला स्व. बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय मदत कक्षाचे राज्याचे ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून काम करण्याची संधी मिळाली आहे अशा शब्दात आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिव्यांग बांधवाचा सन्मान केला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून देशातील पहिले दिव्यांग मंत्रालय राज्यात साकार होत आहे. राष्ट्रीय दिव्यांग दिनाचे औचित्य साधून दिव्यांग बांधवांच्या अडी-अडचणी जाणून घेण्यासाठी आणि संवाद साधण्यासाठी
उद्या सांगोला येथील पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर सभागृह येथे आमदार शहाजीबापू पाटील यांनी सन्मान सोहळा आणि स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. या समारंभास उपस्थित राहून आपल्या अडी-अडचणी आणि समस्या मांडाव्यात असे आवाहन आमदार शहाजीबापू पाटील यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.
0 Comments