google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 तीन वेळा विवाह एकही बायको नाही नांदायला ; युवकाचा सापडला मृतदेहाचा सांगाडा!

Breaking News

तीन वेळा विवाह एकही बायको नाही नांदायला ; युवकाचा सापडला मृतदेहाचा सांगाडा!

 तीन वेळा विवाह एकही बायको नाही नांदायला ; युवकाचा सापडला मृतदेहाचा सांगाडा!

खेड: खेड तालुक्यातील वाफगाव येथे तीन वेळा विवाह झालेल्या एका युवकाने आत्महत्या केल्याची घटना तब्बल महिन्यानंतर उघडकीस आली आहे. शेखर शांताराम पवार असे तरुणाचे नाव आहे. शेखर याचा मृतदेह आंबेगाव तालुक्यातील पहाडदरा येथील डोंगराच्या जंगलात सापडल्याची माहिती पाेलिसांनी दिली.माहितीनूसार शेखर पवार हा पुण्यातील खेड तालुक्यात राहणारा तरुण होता. 

मात्र कामानिमित्त तो कुटुंबीयसोबत आंबेगाव तालुक्यातील पारगाव येथे राहत. शेखर याने आतापर्यंत तीन लग्न केली होती. मात्र काही कारणांमुळे तिन्ही पैकी एकही बायको त्याच्यासोबत नांदत नव्हती. त्यामुळे तो गेल्या काही महिन्यांपासून नैराश्यात होता.

याच नैराश्यातून त्याने घर देखील सोडले होते. वडिलांनी त्याचा शोध घेऊनही तो सापडला नाही. अखेर वडिलांनी १७ नोव्हेंबर २०२२ ला खेड पोलिसांत शेखर बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली होती.दरम्यान आंबेगाव तालुक्यातील पहाडदरा गावच्या हद्दीत असणाऱ्या जंगलात एका झाडावर एका मृतदेहाचा सांगाडा लटकल्याचे आढळून आले.

Post a Comment

0 Comments