सोलापूर जिल्हा प्रशासनाने केले हे आवाहन ; सोलापूरकारांनों, आधार कार्ड किती महत्वाचे ! ही बातमी वाचा
केंद्र शासनाचा उपक्रम, प्रत्येक नागरीक प्रत्येक आधार तसेच अलिकडच्या काळात ओळखीचा पुरावा म्हणून आधारला महत्व प्राप्त झालेले आहे. तसेच नागरीकांना केंद्र शासनाचे तसेच राज्य शासनाचे लाभ घेण्याकरीता आधार कार्ड अद्यावत असणे आवश्यक आहे. आधार कार्ड अद्यावत नसेल तर लाभ होईल रद्द.
त्याअनुषंगाने राज्यातील सर्व नागरीकांना आधार कार्ड नोंदणी करणे तसेच ज्या नागरीकांनी आधार कार्ड काढलेले असतील अशा नागरीकांनी आधार कार्ड अद्यावत करणे तसेच प्रत्येक आधार कार्ड धारकांनी प्रत्येक 10 वर्षांनी आधार कार्ड अपडेट करणे अनिवार्य आहे.
सोलापूर जिल्ह्यातील ज्या नागरीकांना आधार कार्ड काढून 10 वर्षे पूर्ण झालेली आहेत अशा नागरीकांनी आधार कार्ड अपडेट करण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे. आधार योजना सुरु झाली तेव्हा कोणतीही कागदपत्रे ज्यांनी दिले
नाहीत त्यांना आता आधार मध्ये असलेले नाव, पत्ता, जन्मतारीख, वय, लिंग, मोबाईल क्रमांक, ई-मेल आयडी, आदी अद्यावत करावे लागेल. तसेच डोळयाची बुबुळे, बोटांचे ठसे, चेह-याचे सुधारित छायाचित्र द्यावे लागणार आहे. 10 वर्षानंतर आधार अद्यावत करणे
आवश्यक आधार कार्ड काढल्यानंतरी दर पाच ते 10 वर्षांनी आधार अद्यावत करावे लागते. विशेषत: घराचा पत्ता बदललेला असेल तर किंवा लहान मुलांचे आधार कार्ड काढल्यानंतर त्यांना पाच वर्षांनी अपडेट करणे आवश्यक आहे. बोटांचे ठसे, चेह-याचे छायाचित्र बदललेला मोबाईल क्रमांक आदींमध्ये बदल होतो.
पहिल्यांदाच आधार काढताय ?
पहिल्यांदा आधार कार्ड काढत असाल तर संबंधित केंद्राकडे आवश्यक कागदपत्रे द्यावी लागतात. मुलाचे आधार कार्ड काढायचे असेल तर बडिलांचे आधार कार्ड, रहिवासी दाखला, शाळेचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. जन्म नोंदणी प्रमाणपत्र मुलांचे आधार अपडेट कसे कराल?
भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने मुलांच्या आधार कार्डाबाबत मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. प्राधिकरणाने जारी केलेल्या नवीन मार्गदर्शक तत्वांनुसार 5 ते 15 वर्षे वयोगटातील मुलांच्या आधार डेटामध्ये बायोमेट्रीक तपशील अपडेट करणे बंधनकारक आहे आणि तसे करण्याची प्रक्रिया निःशुल्क आहे.
कागदपत्रे काय आवश्यक ?
जन्म प्रमाणपत्र, मार्क शीट्स, ओळखीचा पुरावा, मतदार ओळखपत्र, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट ई. तरी सोलापूर जिल्ह्यातील सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, ज्या नागरीकांनी अद्याप आधार कार्ड काढले नसतील तर आपल्या नजीकच्या आधार केंद्रावर जाऊन आपले आधार कार्ड काढून घ्यावे. तसेच ज्या नागरीकांचे आधार कार्ड काढलेले आहे अशा नागरीकांनी आपले आधार अपडेट करून घ्यावे. जिल्हाधिकारी महोदय यांच्या आदेशानुसार,
0 Comments