सोलापुरात 30 वर्षीय डॉक्टरची आत्महत्या? ; व्हाट्सएपवर ठेवले होते असे स्टेटस ; हिजामा स्पेशालिस्ट गेला
सोलापूर : शहरातील हिजामा थेरपी स्पेशलिस्ट तीस वर्षीय डॉक्टरांने आत्महत्या करून आपले जीवन संपवल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे मुस्लिम समाजातून हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांनी आत्महत्या का? केली याची माहिती समोर येऊ शकली नाही पण आपल्या व्हाट्सएपवर त्यांनी अतिशय भावनिक असे स्टेटस ही ठेवल्याचे समोर आले आहे.
डॉ असद मुन्शी राहणार कर्णिक नगर असे त्या आत्महत्या केलेल्या डॉक्टराचे नाव आहे. त्यांना पत्नी व 3 महिन्यांची मुलगी आहे. शुक्रवारी सायंकाळी त्यांना बेशुद्ध अवस्थेत सोलापुरातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.
एक हसतमुख असे व्यक्तिमत्व आणि सोलापुरात हिजामा स्पेशालिस्ट म्हणून डॉक्टर मुन्शी यांची ओळख होती. सोलापूर शहरात अनेक ठिकाणी त्यांनी हिजामा थेरपी शिबीर घेतले आहे.
शुक्रवारी त्यांनी आपल्या मोबाईल वर असे स्टेटस ठेवले होते...
एक दिन बैठे बैठे,
मुझे अपनी दुनिया बुरी लग गई।
जिसको आबाद करते हुए,
मेरे मां बाप की जिंदगी लग गई।।
सब सवालात अज़बर थे,
जो इश्क के बाब में, मुझसे पूछे गए।
पर सफारिश पे,
इस महकमे में किसी और की नौकरी लग गई।।
0 Comments