४२ वर्षीय महिलेवर घरात घुसून तिघांकडून अत्याचार!
मुंबई: कुर्ल्यातील इंदिरा नगर, बोरी गार्डन परिसरात एका ४२ वर्षीय महिलेच्या घरात घुसून तीन आरोपींनी तिच्यावर बलात्कार केला आहे.याप्रकरणी पीडितेने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी बबलू, वसीम आणि मुन्ना या तीन जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
माहितीनुसार, ४२ वर्षीय पीडित महिला कुर्ला शहरातील इंदिरानगर परिसरात राहते.
आरोपी बबलू, वसीम आणि मुन्ना हे तिघेही जबरदस्तीने पीडित महिलेच्या घरात घुसले. त्यानंतर पीडितेला शिवीगाळ करत तिचे हातपाय बांधले. तसेच महिलेला विवस्त्र करत पेटलेल्या माचिसच्या काड्या तिच्या गुप्तांगावर टाकल्या. त्यानंतर महिलेवर क्रूरपणे अत्याचार केला.
तसेच अत्याचार करतानाचे व्हिडीओही बनवले. तसेच, महिलेच्या केसाला धरून फरफटत नेलं. त्याचबरोबर तिच्या छातीवर आणि हातावर चाकूने वार देखील केले.दरम्यान, या प्रकरणी गुन्हा दाखल होताच, आरोपी फरार झाले आहेत. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
0 Comments