google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 घरात घुसून 15 जणांचं महिला सरपंचासोबत धक्कादायक कृत्य, महाराष्ट्र हादरवणारी घटना

Breaking News

घरात घुसून 15 जणांचं महिला सरपंचासोबत धक्कादायक कृत्य, महाराष्ट्र हादरवणारी घटना

 घरात घुसून 15 जणांचं महिला सरपंचासोबत धक्कादायक कृत्य, महाराष्ट्र हादरवणारी घटना

बुलडाणा जिल्ह्यातून एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. जिल्ह्यातील मेहकर तालुक्यात सारशिव गावात महिला सरपंचाला बेदम मारहाण करण्यात आली.तू फुकट सरपंच झाली असं म्हणत 14 ते 15 लोकांनी या महिला सरपंचाला घरात घुसून मारहाण केली आहे. इतकंच नाही तर या लोकांनी सरपंच महिलेच्या मुलांनादेखील मारहाण केली. 

अर्ध्या रात्री एकत्र आल्या 8 महिला, वृद्धाला रस्त्यावर घेरून चाकूने भोसकलं मारहाण करणाऱ्या सर्व आरोपींविरुद्ध महिला सरपंच रमाबाई जाधव यांनी सुरुवातीला जानेफळ पोलीस स्टेशन गाठले. मात्र त्या ठिकाणी त्यांची तक्रार घेण्यात आली नाही.

नंतर थेट जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे या सरपंच महिलेने तक्रार दाखल केली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातून तक्रार घेऊन त्या महिलेला पुन्हा जानेफळ पोलीस स्टेशनला पाठविण्यात आले. मात्र ती महिला ताटकळत जानेफळ पोलीस स्टेशनला बसलेली होती. तरीही मारहाण करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करत कारवाई करण्यात आली नाही.

त्यामुळे महिला सरपंच हतबल झाल्या आहेत. मारहाणीत हात फॅक्चर झाला असल्याचा आरोप महिला सरपंचाने केला आहे. गंभीर प्रकारची तक्रार असूनही पोलीस मात्र या घटनेकडे दुर्लक्ष करत आहेत. 

ओळख, मैत्री, प्रेम, लिव्ह-इन, शरीरसंबंध अन् गर्भवती झाल्यावर मात्र..., अमरावतीच्या तरुणीसोबत काय घडलं? पोलीस हे प्रकरण गांभीर्याने का घेत नाहीत हा मोठा प्रश्न आहे. आता त्या सरपंच महिलेला न्याय कधी मिळणार? असा प्रश्न उपस्थित होत असून सरपंच महिला न्यायाच्या प्रतीक्षेत आहे. मात्र घरात घुसून महिला सरपंचाला अशाप्रकारे मारहाण केली गेल्याने एकच गोंधळ उडाला आहे.

Post a Comment

0 Comments