google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला कोळे गावातील बोधगिरी वस्तीवर ५,६८,५०० किंमतीचे सोन्याची अज्ञात चोरट्याने घराचे दरवाज्याचे कुलूप तोडुन चोरी....

Breaking News

सांगोला कोळे गावातील बोधगिरी वस्तीवर ५,६८,५०० किंमतीचे सोन्याची अज्ञात चोरट्याने घराचे दरवाज्याचे कुलूप तोडुन चोरी....

सांगोला कोळे गावातील बोधगिरी वस्तीवर ५,६८,५०० किंमतीचे सोन्याची अज्ञात चोरट्याने घराचे दरवाज्याचे कुलूप तोडुन चोरी....

सांगोला कोळा  (बोधगिरी वस्ती) मी सौ. वंदना शिवाजी अलदर वय 49 वर्षे व्यवसाय घरकाम, शिक्षण- 10 वी. रा. बोधगिरी वस्ती,कोळे ता. सांगोला जि.   एकत्रात राहत असुन शेती करून कुटुबाची उपजिवीका करतो. 

माझा मुलगा वैभव हा बरेली येथे आर्मीमध्ये नोकरीस असुन सुन सौ. काजल वैभव आलदर हि मागील 10 दिवसापूर्वी तिथे माहेरी मौजे कंरजे ता. खानापुर जि. सांगली येथे गेलेली आहे. पती आजारी असल्याने त्यांना पुणे येथील ए. आय. सी. टि. हॉस्पीटल पुणे येथे दि. 10/11/2022 रोजी उपचाराकरीता अँडमिट केले होते. 

दि. 22/11/2022 रोजी रात्री 08/00 वा.  सुमारास मी राहत असलेल्या घराच्या दाराला कुलूप लावुन मी माझा मावस भाऊ दत्तात्रय दादु मदने व ड्रायव्हर अनिल महादेव कोळेकर सर्व रा. कोळा ता. सांगोला असे मावस भाऊ दत्तात्रय मदने याचे ओमनी कारने कोळा येथुन पती शिवाजी यावर ऑपरेशन करावयाचे असल्याने पुणे येथे गेलो होतो.

 त्यानंतर मी तेथे पतीजवळच थांबले व पती यांचे ऑपरेशन झाल्यानंतर गायरा भाऊ दत्तात्रय मदने व अनिल कोळेकर असे दोघेजन गाडी घेवुन परत घराकडे निघुन आले होते. दि. 26/11/2022 रोजी पती यांना हॉस्पीटल मधुन डिस्चार्ज दिल्यानंतर मी व माझे पती असे पुणे येथुन येथे रात्री 11/45 वा. चे सुमारास आलो. 

नंतर मी गावातील ओळखीचा साजिद अलाउद्दिन अतार कोळा यास फोन करून कोळा बसस्टॅन्ड जवळ बोलावून घेतले तो तेथे मोटार सायकल घेवुन आला नंतर मी व पती त्याने आम्हाला त्याचे मोटार सायकल सोडून तेथुन निघुन गेला.

 आम्ही घराजवळ गेल्यावर घराचा कुलुप तोडुन जमिनीवर पडलेला होता व दरवाजा थोडासा उघडा दिसला. यामुळे आम्हाला घरामध्ये चोरी झाल्याची शंका आल्याने आम्ही घरात जाऊन पाहीले असता घरामध्ये असलेले लाकडी कपाट उघडले दिसते नंतर किचनमध्ये जावून पाहीले असता किचनमध्ये बनवलेले फर्निचर लाकडी लॉकर उघडा दिसला. 

त्यावेळी आम्हाला  मी ठेवलेले सोन्याचे दागीने पाहिले असता ते दिसुन आले नाही. यावरुन आमची खात्री झाली की आमच्या गैरहजेरी मध्ये कोणीतरी अज्ञात चोरटया घरात प्रवेश करून लाकडी लॉकरमध्ये ठेवलेले सोन्याचे दागीने चोरुन नेले आहे त्याचे वर्णन खालीलप्रमाणे 

1) 2,55,000/- रु. एक 8.5 तोळ्याचे वजनाचे गळ्यातील सोन्याचे चैनचे मंगळसूत्र 

2) 30,000/- रु. चे एक 1 तोळा वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र 

3),90,000/- रु. चे दोन 3 तोळा वजनाचे कानातील सोन्याचे झुबके व सोन्याची साखळी असलेले 

 4)1,20,000/- रु. चे दोन 4 सोळा वजनाचे सोन्याचे चैन त्यापैकी एक 2.5 व दुसरी 1.5 तोळा वजनाची

5)45,000/- रु. तीन 1.5 तोळा वजनाचे सोन्याचे अंगठ्या 

6)21,000 रु. ची एक 7 ग्राम वजनाची सोन्याची उसी कि. अं. . वा. 77,500/- रू किंमतीचे 25 तोला वजनाचा चांदीचा करदोडा

 5,68,500/ किंमतीचे सोन्याचे व चांदिचे दागिणे दि. 22/11/2022 रोजी रात्री 08/00 वा. ते दि. 26/11/2022 रोजी रात्री 11/45 मा. दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्याने घराचे दरवाज्याचे कुलूप तोडुन घरात प्रवेश करून किचन रुममधील लाकडी लॉकरमध्ये ठेवलेले सोन्याचे व चांदिचे दागिणे चोरी करुन घेवुन गेले आहेत . पुढील तपास पोलीस घुले साहेब करत आहे

Post a Comment

0 Comments