google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 दैनिक माणदूत एक्सप्रेसच्या वर्धापन दिनानिमित्त १६ ऑक्टोबर रोजी गुणवंताचा सत्कार व पुरस्कार वितरण सोहळा काय झाडी... काय डोंगार... फेम आ. शहाजीबापू पाटील यांची थेट मुलाखत

Breaking News

दैनिक माणदूत एक्सप्रेसच्या वर्धापन दिनानिमित्त १६ ऑक्टोबर रोजी गुणवंताचा सत्कार व पुरस्कार वितरण सोहळा काय झाडी... काय डोंगार... फेम आ. शहाजीबापू पाटील यांची थेट मुलाखत

 दैनिक माणदूत एक्सप्रेसच्या वर्धापन दिनानिमित्त १६ ऑक्टोबर रोजी गुणवंताचा सत्कार व पुरस्कार वितरण सोहळा..

काय झाडी... काय डोंगार... फेम आ. शहाजीबापू पाटील यांची थेट मुलाखत

सांगोला दुष्काळी भागातील जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असलेल्या आणि समाजहिताच्या दृष्टीने विधायक दृष्टीकोन ठेवून सांगोलासह माणदेशाचा मानबिंदू बनलेल्या व विश्वास वृत्तपत्र म्हणून मान्यता मिळालेल्या दैनिक माणदूत एक्सप्रेस या दैनिकाचा २० यान दिन रविवार दि. १६ ऑक्टोबर २०२२ रोजी साजरा होत आहे. वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहेत.

सांगोला शहर, तालुका व परिसरातील त्याचप्रमाणे माणदेशातील याचक, जाहिरातदार, विक्रेते, उद्योजक व्यवसायिक आणि हितचिंतक या सर्वांच्या प्रचंड पाठ लोकप्रिय असलेल्या दैनिक माणदूत एक्सप्रेसच्या वर्धापन दिनानिमित्त सांगोला तालुका व माणदेशातील लोकहिताच्या दृष्टीने असामान्य कार्य करणाऱ्या ७ मान्यवर व्यक्तीमत्वांचा शहाजीबापू पाटील, मा. आ. दिपकआबा साळुंखे-पाटील,

जिल्हा पोलीस प्रमुख श्रीमती तेजस्वी सातपुते मॅडम यांच्या शुभहस्ते आणि श्रीमती रतनबाई गणपतराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली रविवार दि. १६ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर स्मृतीवन सांगोला येथे गुणगौरव व पुरस्कार वितरण सोहळा आयोजीत करण्यात आला आहे. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून ज्ये नेते श्री. बाबुराव गायकवाड, श्री. चंद्रकांतदादा देशमुख, डॉ. बाबासाहेब

देशमुख, डॉ. अनिकेत देशमुख, फॅबटेक उद्योग समुहाचे श्री. भाऊसाहेब पर भाजपा तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

 या सत्कार गौरव सोहळ्यामध्ये सांगोल्याचे सुपुत्र दिवाणी न्यायाधिश वरिष्ठ स्तर रत्नागिरी मा.श्री. अमित नागेश कुलकर्णी, सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रा. प्रबुध्दचंद्र झपके, सांगोला अर्बन बँकेचे संस्थापक डॉ. प्रभाकर माळी, केळकर हॉस्पीटलवेयश संपादन केले आहे

 अशा ९० टक्के पेक्षा अधिक गुण मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थी / विद्यार्थीनीचा जिल्हा पोलीस प्रमुख श्रीमती तेजस्वी सातपुते मॅडम यांच्या शुभहस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात येणार आहे. या सत्कार सोहळ्यानंतर आ. जहाजीबापू पाटील यांची थेट मुलाखत घेण्यात येणार आहे.

याच दिवशी सायंकाळी ५ ते ८ या वेळेत दैनिक माणदूत एक्सप्रेस कार्यालयाच्या प्रांगणात वाचक,

जाहिरातदार, विक्रेते, उद्योजक, व्यवसायिक आणि हितचितक या स्नेहमेळावा आयोजीत करण्यात आता आहे.

तरी वरील सर्व कार्यक्रमास सांगोला शहरासह माणदेशातील सर्व क्षेत्रातील मान्यवर व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन दैनिक माणदूत एक्सप्रेसच्यावतीने श्री. मोहन मस्के, श्री. विनायक मस्के, श्री. सुनिल मस्के, अमेय मस्के यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments