google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 चक्क १०८ वर्षांच्या वृद्ध महिलेचे चांदीच्या कड्यासाठी दोन्ही पाय कापले !

Breaking News

चक्क १०८ वर्षांच्या वृद्ध महिलेचे चांदीच्या कड्यासाठी दोन्ही पाय कापले !

चक्क १०८ वर्षांच्या वृद्ध महिलेचे चांदीच्या कड्यासाठी  दोन्ही पाय कापले !

 चांदीच्या कड्यासाठी चक्क १०८ वर्षांच्या वृद्ध महिलेचा पाय कापण्याचे पाप चोरट्यांनी केले असून या अमानुष कृत्याने चोरांची पातळी दाखवून दिली आहे. 

पैसा आणि संपत्तीसाठी चोर कुठल्याही ठरला जात असल्याचे दिसत आहे. चोरी करायला गेलेले चोर माणुसकी दाखवून परत गेल्याच्याही काही घटना घडल्या आहेत. पैसा, संपत्ती, दागिने अशा मोहात माणूस माणसांच्याच जीवावर उठतो ही बाब आता काही नवी राहिली नाही परंतु राजस्थानमधील एक घटना कुठल्याही संवेदनशिल माणसाला सहन न होणारीच आहे. पैसा माणसाला आंधळे बनवतो पण त्याची खोलीच या घटनेने दाखवून दिली आहे. 

मीना वसाहतीत जमुनादेवी या १०८ वयाच्या वृद्ध महिला आपल्या मुलीसोबत राहतात. त्यांची मुलगी घराच्या जवळच असलेल्या मंदिरात पूजेसाठी गेली आणि हीच संधी राक्षसी वृत्तीच्या चोरांनी साधली. आधीपासून दबा धरून बसलेले चोर मुलगी पूजेला जाताच त्या घरात घुसले. एकटी १०८ वर्षांची वृद्धा त्यांना रोखू शकत नव्हती की कसला प्रतिकार करू शकत नव्हती. घरात घुसलेल्या चोरट्यांनी घरात लुट सुरु केली. यावेळी वृद्ध जमुनादेवी यांच्या पायात असलेल्या चांदीच्या कड्यावर पडली. हे कडे मिळविण्यासाठी चोरांनी चक्क या वृद्ध महिलेचा पाय कापून काढले आणि चांदीचे कडे घेवून पसार झाले. 

काही वेळाने मुलगी पूजा करून घरी आली तेंव्हा आई कुठेच दिसत नव्हती. तिने आईचा शोध घेतला तेंव्हा आई बाथरूममध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडलेली होती आणि तिचे  दोन्ही पाय कापून काढण्यात आले असल्याचे दिसले. पायातील कडेही गायब होते. अचानक हा सगळा प्रकार पाहून मुलीने आरडाओरडा सुरु केला. तिचा आवाज ऐकून शेजारी धावत आले तेंव्हा त्यानाही हे भयानक आणि अमानुष कृत्य पहायला मिळाले. शेजारी नागरिकांनी तातडीने वृद्ध जमुनादेवी यांना रुग्णालयात दाखल केले. 

माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी एकूण गुन्ह्याची परिस्थिती पाहिली. घटनास्थळी त्यांना एक चाकू देखील मिळाला असून सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याच्या आधाराने पोलिसांनी आरोपींचा शोध सुरु केला आहे. चोरीच्या या अमानुष प्रकाराने नागरिकांना धक्का बसला असून वृद्ध व्यक्तींना घरात एकटे सोडून जाणेही आता धाडसाचे वाटू लागले आहे. वृद्धांची सुरक्षा पुन्हा एकदा धोक्यात आली असल्याचे या घटनेने अधोरेखित केले आहे.

Post a Comment

0 Comments