google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 रेल्वेमध्ये सुशीलकुमार शिंदे यांचा मोबाईल चोरण्याचा प्रयत्न ; चोरट्याला पकडले ; चोरटा तर निघाला.....

Breaking News

रेल्वेमध्ये सुशीलकुमार शिंदे यांचा मोबाईल चोरण्याचा प्रयत्न ; चोरट्याला पकडले ; चोरटा तर निघाला.....

 रेल्वेमध्ये सुशीलकुमार शिंदे यांचा मोबाईल चोरण्याचा प्रयत्न ; चोरट्याला पकडले ; चोरटा तर निघाला.....

सोलापूर : माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा मोबाईल चोरण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी राष्ट्रवादीच्या ग्रामपंचायत सदस्याच्या मुलाला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे. 

ही घटना गुरूवारी  सकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान दादर रेल्वे स्टेशन येण्याच्या पूर्वी घडली. मंदार प्रमोद गुरव वय-२३, रा.मु.पो .घाटणे ,ता. माढा.जि. सोलापूर असे या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

याबाबत अधिक मिळालेली माहिती अशी की, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे व त्यांची कन्या आमदार प्रणिती शिंदे यांना मुंबई येथे कामानिमित्त जायचे होते. त्यामुळे त्यांचे रिझर्वेशन हे गाडी नं १२११६ सिद्धेश्वर एक्सप्रेस बोगीच्या एचए-१ कंपार्टमेंटमधील कुपी नं ए मध्ये केले होते. त्यावेळी विलास कृष्णकांत गांवकर व संजय तुकाराम राजेशिर्के यांना पोलीस हवालदारांची या पीएसओ म्हणून नेमणूक करण्यात आली होती.

दादर रेल्वे स्टेशन येण्यापूर्वी शिंदे हे बाथरूमला गेले होते. ते बाथरूममधून बाहेर आले असता, मंदार गुरव हा शिंदे यांचा सीटवर ठेवलेला मोबाईल फोन घेऊन जाण्याचा प्रयत्न करत होता. त्यावेळी शिंदे यांनी त्याला रंगेहात पकडून ठेवले. त्यानंतर हवालदार गांवकर आणि राजेशिर्के यांना कुपीमध्ये बोलावून घेऊन मंदार गुरव याला त्यांच्या ताब्यात दिले. याप्रकरणी हवालदार गांवकर यांनी दादर रेल्वे पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा मोबाईल चोरी करण्याचा प्रयत्न करणारा मंदार गुरव हा सोलापुरातील माढा तालुक्यातील घाटणे गावचा असून, त्याचे वडील ग्रामपंचायत सदस्य आहेत. तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सदस्याचा मुलगा आहे.

Post a Comment

0 Comments