google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 श्री. जे. पी. लवटे यांचा कोळे ग्रामपंचायतचा पदभार कायम ठेवावा सरपंच उपसरपंच ग्रा. पं. सदस्य व ग्रामस्थांचा सांगोला पंचायत समिती समोर आंदोलनांचा इशारा...

Breaking News

श्री. जे. पी. लवटे यांचा कोळे ग्रामपंचायतचा पदभार कायम ठेवावा सरपंच उपसरपंच ग्रा. पं. सदस्य व ग्रामस्थांचा सांगोला पंचायत समिती समोर आंदोलनांचा इशारा...

 श्री. जे. पी. लवटे यांचा कोळे ग्रामपंचायतचा पदभार कायम ठेवावा सरपंच उपसरपंच ग्रा. पं. सदस्य व ग्रामस्थांचा सांगोला पंचायत समिती समोर आंदोलनांचा इशारा..


सांगोला कोळे गावातील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य  बी. जे. पी. लवटे यांनी पदभार घेतल्यापासून आमच्या ग्रामपंचायतच्या कारभाराचा चेहरामोहरा बदलला बसून, त्यांनी कोळे ग्रामपंचायतचा पदभार घेण्यायगोदर ग्रामपंचायतच्या बैंक खात्यावर कर्मचाऱ्यांचे पगार करण्याइतपत सुद्धा कम शिल्लक नव्हती,


ग्रामपंचायत सदस्यांना बसण्यास खुर्चीची सोय सुद्धा नव्हती अशा परिस्थितीत श्री. जे. पी. लवटे यांनी कोळे ग्रामपंचायतचा चार्ज घेऊन त्यांनी त्यांच्या कामाच्या शैलीने ग्रामपंचायतच्या सर्व १७ सदस्यांना विश्वासात घेऊन एकदिलाने काम करून, गावाचा विकास करण्याची प्रतिज्ञा घेतली.
 ग्रामपंचायतच्या सर्व नवनियुक्त सदस्यांना ग्रामपंचायत अधिनियमाच्या कायदयाच्या बाजू समजावून सांगून ग्रामपंचायतचा कारभार पारदर्शकपणे कसा करावयाचा याबाबत त्यांनी आम्हा सर्व सदस्यांना विश्वासात घेऊन कामकाजाचा कानमंत्र दिला. ग्रामपंचायतच्या सर्व कर्मचान्यांना आपलेसे करून सर्व कर्मचारी सर्व सदस्य व स्वतः ग्रामसेवक यांनी एकोप्याने, विश्वासाने काम केल्यास गावाच्या सर्व अडचणी सोडवता येतील हे पटवून दिले.

त्यांनी गावाचा चार्ज घेतल्याबरोबर गावाच्या सर्व समस्या, अडचणी समजावून घेतल्या सर्व अंगणवाच्या, शाळा यांच्या मीटिंग घेतल्या व गावातील प्रत्येक शासकीय विभागाने गावाच्या विकासासाठी समन्वयाने काम करूया असे आवाहन केले. हे करत असताना त्यांनी मागील उन्हाळ्यामध्ये भिषण पाणीटंचाईत सर्वांच्या सहकार्याने गावाचा पाणीपुरवठा सुरळीत केला. गावातील सर्व अतिक्रमण शोधून काढती सर्व बोगस नळ कनेक्शन शोधून काढली, 

थकीत व्यवसाय कर धारकाची यादी काढली, ग्रामपंचायत स्थापनेपासून आजपर्यंत यकीत घरपट्टीधारकांचीयादी तयार केली या सर्व थकीत कर धारकांना वेगवेगळ्या प्रसारमाध्यमातून नोटीसद्वारे व्हाट्सप द्वारे मासिक व ग्रामसभेद्वारे कर भरण्याचे आवाहन त्यांनी २६


 जानेवारी २०२२ पासून १८ रुपये करांचा व्यावसायिक गाळेवाल्यांचा तंटा सोडवून सर्वांना समान न्याय देऊन त्यांचेकडून चकीत कर भरून घेतला. वसूल झालेल्या करातून उन्हाळ्यातील पाणीटंचाई, कर्मचाऱ्यांचा दरमहा ०३ तारखेला पगार १५२ मागासवर्गीय खर्चाचे उद्दीष्ट, १०६ महिला बालकल्याण उद्दीष्ट ५३ अपंग कल्याण उद्दीष्ट मागील अनुशेषासह भरून काढले. 

गावातील वाढलेली चिलार झाडे, गल्ली बोळातील कचऱ्याचे ढीग उचलून त्याची योग्य विल्हेवाट लावली त्यांनी त्यांच्या कामकाजादिवशी सकाळी ०९ ते सायं ०६ वाजेपर्यंत काम करून ग्रामपंचायतचे सर्व स्तरात केले. अशाप्रकारे ग्रामपंचायतला पूर्णवेळ देऊन सर्व कर्मचारी व सदस्यांना विश्वासात घेऊन काम करणाऱ्या कर्तव्यदक्ष 

ग्रामसेवकाची बदली करण्यामागील हेतु काय गावातील ग्रामस्थ, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामपंचायत कर्मचारी यांच्याकडून ग्रामसेवक यांच्या कामकाजाबाबत तक्रार नसताना केवळ स्वाधनि पछाडलेल्या एखाद्या व्यक्तीचे ऐकून आपण जर ग्रामसेवकाची बदली करणार असाल तर आम्हाला 

वरिष्ठ कार्यालयाकडे दाद मागावी सागेत व नाईलाजास्तव पंचायत समिती समोर आंदोलन ही करावे लागेल. तरी महोदय कुठल्यातरी एका व्यक्तीचे ऐकून आपण ग्रामसेवक श्री. जे. पी. लवटे यांचा कोळे ग्रामपंचायतचा पदभार काढून घेऊ नये व त्यांना कोळे ग्रामपंचायत चा कायमचा पदभार देण्यात यावा ही विनंती.

उपोषण कार्यकर्ते- सरपंच, उपसरपंच ,ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ

Post a Comment

0 Comments