शहीद अशोक कामटे संघटनेच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी
सांगोला (प्रतिनिधी )जगाला सत्य आणि अहिंसेची शिकवण देणारे शांतीचे प्रतिक राष्ट्रपिता महात्मा गांधी व स्वतंत्र भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती शहीद अशोक कामटे बहुउद्देशीय सामाजिक संघटनेच्यावतीने साजरी करण्यात आली.
सुरुवातीस स्टेशन रोड येथे तोरणा मुख्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सांगोला रेल्वे स्टेशनचे अधीक्षक सत्येंद्र सिंह यांच्या शुभहस्ते प्रतिमेस पुष्पहार समर्पित करून अभिवादन करण्यात आले .यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थापक अध्यक्ष नीलकंठ शिंदे सर व आभार प्रदर्शन चारुदत्त खडतरे यांनी मानले कार्यक्रमात संघटनेच्या सर्व सदस्यांनी या थोर पुरुषास फुले वाहून अभिवादन केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व व्यापारी संघटनेचे सदस्य यांचे सहकार्य लाभले.


0 Comments