विविध उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला चालना मिळते :- सुरेश पाटील वामनराव शिंदे साहेब प्रशालेत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न ..
सांगोला( प्रतिनिधी)वामनराव शिंदे साहेब आदर्श विद्यालयात विद्यार्थ्यांकरता विविध उपक्रम राबविले जातात. त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता ही प्रशाला सदैव तत्पर असते त्यामुळे संपूर्ण तळागाळातील विद्यार्थ्यांना त्याचा लाभ मिळतो. यापुढील काळात देखील संस्थेने आपली गुणवत्ता कायम ठेवून, आरोग्य शिबिरासारखे विधायक उपक्रम देखील कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन पंचायत समिती शिक्षण विभागाचे सुरेश पाटील यांनी या शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी केले .
यावेळी प्रशालेच्या 36व्या वर्धापन दिनानिमित्त आरोग्य तपासणी शिबिराचे उदघाटन डॉ. अजिंक्य नष्टे यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात संस्थापक कै. वामनराव शिंदे साहेब व सरस्वती पुजनाने प्रमुख मान्यवरांचे हस्ते पुष्पहार समर्पित करून करण्यात आली.
संस्थाध्यक्षा श्रीमती कौशल्यादेवी शिंदे मॅडम, सचिव नीलकंठ शिंदे सर यांची प्रमुख उपस्थिती होती. या दिनाचे औचित्य साधून संस्थेच्यावतीने राष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेत गोल्ड मेडल मिळाल्याबद्दल चिन्मय पाटील याचा शाल ,श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी तपासणीकरता आलेले रुग्ण व विद्यार्थ्यांची वैद्यकीय चाचणी करून त्यांचे समुदेशन करण्यात आले. या संपूर्ण शिबिराकामी अजिंक्यतारा हॉस्पिटलचे सहकार्य लाभले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक रमेश पवार सर यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी अजिंक्यतारा मल्टीकेअर हॉस्पिटल येथील सर्व स्टाफ, प्रशालेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.



0 Comments