वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष
महाराष्ट्र राज्य ब्रँड अँबेसिडर पदी आमदार शहाजीबापू पाटील यांची निवड
सांगोला /प्रतिनिधी. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. ना.श्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि खा डॉ श्रीकांत शिंदे साहेब यांचे सूचनेनुसार वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आणि डॉ श्रीकांत शिंदे फाउंडेशन च्या ब्रँड अँबेसेडर पदी सांगोला विधानसभेचे लोकप्रिय आमदार शहाजीबापू पाटील यांची काल ठाणे येथे खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन च्या ब्रँड अँबेसिडर निवडीचे पत्र देऊन निवड करण्यात आली
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रभर शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून गोरगरीब गरजू आणि आर्थिक दुर्बल घटकातील रुग्णांना धर्मदाय रुग्णालयात राखीव खाटा उपलब्ध करून देणे निकषात बसत असलेल्या गरीब रुग्णांवर पूर्णतः मोफत किंवा सवलतीच्या दरात शस्त्रक्रिया करण्यासंदर्भात मदत तसेच
महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत नोंदणी असलेल्या रुग्णालयामध्ये गरजू रुग्णांना शस्त्रक्रिया मोफत करणे गंभीर महागड्या शस्त्रक्रिया करायचे असल्यास गोरगरीब रुग्णांना भरीव प्रमाणात अर्थसहाय्य व्हावी याकरिता पंतप्रधान वैद्यकीय सहायता निधी, मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी, सिद्धिविनायक ट्रस्ट, टाटा ट्रस्ट, यासारख्या विविध ट्रस्टच्या माध्यमातून मदत मिळवून देण्यासाठी शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष कार्यरत आहे या कक्षाच्या महाराष्ट्र राज्याच्या ब्रँड अँबेसिडर पदी लोकप्रिय आमदार शहाजी बापूपाटील यांची निवड झाल्याने विविध योजनांचा रुग्णांना निश्चितच फायदा होणार आहे
आमदार शहाजीबापू पाटील यांच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यातील रुग्णांच्या मध्ये जन जागृती करून महाराष्ट्र राज्यातील रुग्ण उपचारावीणा रहाणार नाही असा विश्वास यावेळी डॉ श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला.
यावेळी आमदार शहाजीबापू पाटील यांनी बोलताना सांगितले मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे व खा डॉ श्रीकांत शिंदे यांनी माझी वंदनीय बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय मदत कक्षाच्या ब्रँड अँबेसिडरपदी मला जबाबदारी दिली ती मी पूर्णपणे आवडीने पार पाढेन व महाराष्ट्र राज्यातील रुग्ण मदत शिवाय वंचीत रहाणार नाही दिलेली जबाबदारी म्हणजे रुग्णाची सेवा करण्याची संधी दिली आहे



0 Comments