सांगोला शहर काँग्रेसच्या वतीने महात्मा गांधी यांची जयंती साजरी.
सांगोला(प्रतिनिधी)-राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची १५३ वी जयंती सांगोला शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने सांगोला शहरातील नेहरू चौक येथे साजरी करण्यात आली . राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन नगरपरिषदेचे मुख्याधिकारी कैलास केंद्रे व इंजिनीयर रमेश जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.
त्यानंतर भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या अर्ध पुतळ्यास सांगोला शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तोहिद मुल्ला, महिला काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्ष मैनाताई बनसोडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
देशाच्या स्वातंत्र्य चळवळीतील अहिंसावादी नेते म्हणून महात्मा गांधीजी यांची ओळख जगाला परिचित आहे. सर्व जाती धर्माला एकत्र जोडणारा समानतावादी विचार महात्मा गांधी यांनी आपल्या सर्वांना दिला. असे मत सांस्कृतिक विभागाचे राज्य उपाध्यक्ष ॲड. महादेव कांबळे यांनी व्यक्त केले
देशाला स्वातंत्र्य मिळवून देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी स्वातंत्र्यदिनी 15 ऑगस्ट 1947 रोजी लाल किल्ल्यावरती तिरंगा फडकवण्यासाठी का उपस्थित नव्हते? याचे उत्तर आज भारतीयांनी शोधले पाहिजे . दलितांना हरिजन असे संबोधन देशामध्ये एकता निर्माण करण्याचा प्रयत्न महात्मा गांधी यांनी केला. असे मत सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अभिषेक (भैया) कांबळे यांनी व्यक्त केले.
आज या ठिकाणी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती साजरी करीत आहोत. गांधीजी यांच्या जयंतीनिमित्त आपण एकत्र आलो आहोत. गांधीजी यांचे विचार आत्मसात करून जनसामान्यापर्यंत पोहोचवण्याचे काम आपण सर्वांनी पार पाडले पाहिजे असे मत सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष रवींद्र कांबळे यांनी व्यक्त केले.
यावेळी सांगोला शहर काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष तोहीद मुल्ला , सोलापूर जिल्हा महिला काँग्रेसच्या उपाध्यक्षा मैनाताई बनसोडे, सोलापूर कॉंग्रेस कमिटीचे सरचिटणीस अभिषेक कांबळे, सांस्कृतिक विभागाचे कॉंग्रेसचे राज्य उपाध्यक्ष ॲड.महादेव कांबळे, सोलापूर जिल्हा काँग्रेस कमटीचे उपाध्यक्ष रवींद्र कांबळे, जनसेवा संघटनेचे नेते, असगर पठाण, संतोष ऐवळे,
सांस्कृतिक विभागाचे सांगोला तालुकाध्यक्ष प्रा. दत्तात्रय वाघमारे, आनंदा काटे, माजी नगसेवक बिरुदेव माने, ना. मा. कांबळे,मयूर मागाडे, निहाल तांबोळी (ऑल इंडिया मुस्लिम ऑर्गनायझेशन सांगोला तालुका अध्यक्ष), सिद्धेश्वर देशमुख, रहमान मुजावर (अध्यक्ष सांगोला तालुका मुजावर जमात), संदीप कोळेकर, रमजान मुल्ला, प्रदीप सावंत, मोहसीन पठाण, रोहित कारले, अशरफ मुल्ला, पुण्यवंत साठे,
वाहीद मुलाणी, संजय रणदिवे, पप्पू खतीब, गदर साठे, अक्षय रणदिवे, मुबीन काझी, सुखदेव साठे, हैदर मुलाणी, विशाल रणदिवे, रमजान मुलाणी, आदित्य खरात, रफिक शेख, सतीश गायकवाड, नसीर मुजावर, किशोर कांबळे, इंजि.इरफान खतीब, नितीन भोसले, साकिब मुलाणी, दत्ता रणदिवे, बाळासाहेब रणदिवे, मसूद मणेरी,भारत सातपुते, टिपू काझी, शाहरुख मुलाणी व इतर काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी प्रा. दत्तात्रय वाघमारे यांनी आभार मानले.


0 Comments