google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 पार्टीनिमित्त घरी आलेल्या तरुणांनी गुंगीचा स्प्रे मारुन केला सामुहिक बलात्कार !

Breaking News

पार्टीनिमित्त घरी आलेल्या तरुणांनी गुंगीचा स्प्रे मारुन केला सामुहिक बलात्कार !

 पार्टीनिमित्त घरी आलेल्या तरुणांनी गुंगीचा स्प्रे मारुन केला सामुहिक बलात्कार !

पुणे: कोंढवा येथील एका सोसायटीमध्ये पार्टीनिमित्त घरी आलेल्या ओळखीच्या तरुणांनी एका तरुणीवर गुंगीच्या औषधाचा स्प्रे मारुन सामुहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

 याबद्दल अधिक माहिती अशी कि, कोंढवा येथील एका सोसायटीमध्ये ९ तारखेला पीडित तरुणीच्या मैत्रिणीने त्यांच्या फ्लॅटमध्ये पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीसाठी पीडित तरुणीच्या मैत्रिणीने तिचे मित्र राकेश, मोहम्मद यांना देखील बोलावले होते.

 यानंतर दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास संबंधित तरुणी आराम करण्यासाठी दुसऱ्या खोलीत गेली तिथेच तिची झोप लागली. ती झोपलेली पाहून तिन आरोपींनी तिच्या तोंडावरती गुंगीचेऔषध मारुण तिला आधी बेशुद्ध केलं आणि तिच्यावरती तिघांनी बलात्कार केला.

 दरम्यान, पीडित मुलगी शुद्धीवर येताच तिला आपल्यासोबत काही तरी विपरित घडल्याचं समताच तिने त्या तिघांविरोधात तक्रार दिली असता कोंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

Post a Comment

0 Comments