google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 मुलीची हत्या झाल्याचे कळताच वडिलांनी घेतले विष; आईची कॅन्सरशी झूंज सुरू

Breaking News

मुलीची हत्या झाल्याचे कळताच वडिलांनी घेतले विष; आईची कॅन्सरशी झूंज सुरू

 मुलीची हत्या झाल्याचे कळताच वडिलांनी घेतले विष; आईची कॅन्सरशी झूंज सुरू

काल चेन्नई पारंगीमलाई रेल्वे स्थानकावर चालत्या सबअर्बन ट्रेनसमोर ढकलुन एका तरुणाने महाविद्यालयीन विद्यार्थीनी सत्याची हत्या केली. 

या संदर्भात, तपासासाठी 7 विशेष दल तयार करण्यात आले होते. काल मध्यरात्री ईस्ट कोस्टल रोडवर धक्का देणाऱ्याला अटक करण्यात आली आहे. दरम्यान, सत्याची हत्या केल्याची माहिती तिच्या वडीलांना देण्यात आल्यानंतर त्यांनी विष घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. 

या महाविद्यालयीन विद्यार्थिनीची आई रमालक्ष्मी यांना कॅन्सरचा आजर असून त्यांच्यावपर उपचार सुरू आहेत. विद्यार्थिनीच्या हत्येनंतर कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. 

या घटनेने स्थानिकांमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. तसेच, चेन्नईचे पोलीस आयुक्त शंकर जिवल यांनी महाविद्यालयीन विद्यार्थिनी सत्याच्या घरी जाऊन तिच्या आईचे सांत्वन केले. या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या सतीशची चौकशी तांबाराम रेल्वे पोलिस करत आहेत.

Post a Comment

0 Comments