google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 “शहाजीबापू तुम्ही पवारांवर टीका करू नका” हे शेवटचे सांगतोय”दीपकआबा साळुंखे – पाटील यांनी आमदार शहाजीबापू पाटील यांना सुनावले.

Breaking News

“शहाजीबापू तुम्ही पवारांवर टीका करू नका” हे शेवटचे सांगतोय”दीपकआबा साळुंखे – पाटील यांनी आमदार शहाजीबापू पाटील यांना सुनावले.

 “शहाजीबापू तुम्ही पवारांवर टीका करू नका” हे शेवटचे सांगतोय”दीपकआबा साळुंखे – पाटील यांनी आमदार शहाजीबापू पाटील यांना सुनावले.

सांगोला :  प्रतिनिधी… मी आता जास्त बोलणार नाही. हल्ली बोलायचं सर्व काम शहाजीबापू करतायत. शहाजीबापू तुम्ही बोला, मात्र इथून पुढे तुम्ही पवारांवर टीका करू नका. मी आज ठणकावून सांगतोय. हे शेवटचे सांगतोय” अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी आमदार दीपकआबा साळुंखे – पाटील यांनी आमदार शहाजीबापू पाटील यांना सुनावले.

त्याचे झाले असे, सांगोला सहकारी साखर कारखान्याचा बॉयलर अग्निप्रदिपन व द्वितीय गळीत हंगामाचा शुभारंभ संपन्न झाला. या कार्यक्रमात उपस्थित आजी-माजी आमदारांनी तुफान राजकीय फटकेबाजी केली.

दीपकआबा यांनी ही भूमिका मांडताच आमदार शहाजीबापू पाटील यांनी इथून पुढे पवार कुटुंबियांवर टीका करणार नसल्याचे जाहीर केले. 

ते म्हणाले की, “खासदार शरदचंद्रजी पवार हे माझे दैवतच आहेत ते देशातील ज्येष्ठ नेते आहेत आपण त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक वर्ष राजकीय प्रवास केला आहे. आपले सहकारी मित्र मा.आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या सुचनेनुसार यापुढील काळात आपण खा. शरदचंद्र पवार आणि पवार कुटुंबीयांवर टीका करणार नाही”

शनिवार दि ८ रोजी सांगोला सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करताना आमदार शहाजीबापूंना उद्देशून म्हणाले, खा. शरदचंद्र पवार हे राज्याचे नव्हे तर संपूर्ण देशाचे नेते आहेत.

 देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि सर्वच राजकीय पक्षांचे प्रमुख त्यांचा आदर करतात. त्यांचा राजकीय अनुभव व जेष्ठता लक्षात घेऊन आमदार शहाजीबापूंनी खासदार शरदचंद्रजी पवार व पवार कुटुंबीयांवर बोलताना तारतम्य ठेवावे आणि त्यांच्यावर टीका करू नये असा सूचनावजा सल्ला दिपकआबांनी आपले सहकारी मित्र आमदार बापूंना दिला होता.

हाच धागा पकडून पुढे आमदार शहाजीबापू पाटील म्हणाले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरदचंद्रजी पवार हे माझे दैवत आहेत. मी आपल्या राजकीय प्रवासातील अनेक वर्षे त्यांच्या नेतृत्वाखाली काम केले आहे. देशातील सर्व दिग्गज नेत्यांना त्यांचा आदर आहे. यापुढील काळात खासदार शरदचंद्रजी पवार व पवार कुटुंबीयांवर मी टीका करणार नाही अशी भूमिका शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी घेतली.

यावेळी कारखान्याचे चेअरमन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मा.आम. दिपकआबा साळुंखे पाटील, शेकापचे बाबासाहेब देशमुख, तसेच डीव्हीपी परिवाराचे अध्यक्ष व श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत आबा पाटील,

 विठ्ठलचे व्हाईस चेअरमन सौ.प्रेमलताताई रोंगे, सांगोला साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन विश्वनाथ चव्हाण, तानाजी काका पाटील, सुभाष पाटील, तुकाराम जाधव, ॲड.मारुती ढाळे, अभिजीत नलवडे, मधुकर नाईकनवरे, विष्णुभाऊ बागल तसेच धाराशिव साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक अमर पाटील आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments