google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 २४ वर्षीय विधवा महिलेस लग्नाचे आमिष दाखवून केला आत्याचार... मंगळवेढा तालुक्यातील घटना..

Breaking News

२४ वर्षीय विधवा महिलेस लग्नाचे आमिष दाखवून केला आत्याचार... मंगळवेढा तालुक्यातील घटना..

 २४ वर्षीय विधवा महिलेस लग्नाचे आमिष दाखवून केला आत्याचार... मंगळवेढा           तालुक्यातील घटना..

 एका 24 वर्षीय विधवा महिलेस लग्नाचे आमीष दाखवून शरीर संबध ठेऊन ऐनवेळी लग्नास नकार देऊन शिवीगाळ, दमदाटी केल्याप्रकरणी अतिश वसंत काटे (रा.महमदाबाद ता.मंगळवेढा) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, यातील फिर्यादीच्या पतीचे आपघाती निधन झाले आसुन फिर्यादी व आराेपी नात्याने पाहूणे आहेत. आरोपीहा अविवाहीत आसल्याने पिडीतेस मी तुझ्याबराेबर लग्न करताे माझ्याशी शाररिक संबध ठेव आसे म्हणुन

आराेपीने घराशेजारील बाजरीच्या पिकात नेऊन तिन वेळा शरीरसंबध ठेवले. आराेपीने दिनांक 20 सप्टेबर रोजी रात्री १२.१५ वाजता आपण लग्न करू असे म्हणून

पिडीतेस व तीच्या ७ वर्षीय मुलीस मोटरसायकलवर बसून पंढरपूर येथे घेऊन गेला व तेथून एसटीने कराड येथे एका लॉजवर नेऊन दोन दिवस मुक्काम केला तिथे लग्नाचे आमिष दाखवून शरीर संबंध ठेवले.

गावी आल्यानंतर फिर्यादीने लग्न करूया असे म्हटल्यावर तुझ्यासोबत लग्न करणार नाही तू दुसऱ्या कोणाबरोबर लग्न कर असे म्हणाला असल्याचे दिलेले फिर्यादीत म्हटले आहे अधिक तपास पोलीस करीत आहेत.

Post a Comment

0 Comments