सोलापूर इंजिनिअर मुलाने आईवर जीवघेणा हल्ला केला.
लॉकडाऊनचा फटका अनेकांना बसला आहे. लॉकडाऊनमुळे सोलापूर शहरातील इंजिनिअर असलेला सुफीयान शेख मानसिक रोगी झाला होता. मंगळवारी 4 ऑक्टोबर रोजी सकाळी या इंजिनिअर मुलाने पोटच्या आईवर जीवघेणा हल्ला केला आहे. घरात ठेवलेल्या चाकुने तब्बल तीन वार करत आईला भोकसले आहे
नातेवाईकांनी ताबडतोब जखमी महिलेला सोलापुरातील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. जखमी आई शासकीय रुग्णालयात अतिदक्षता विभागात मृत्यूशी झुंज देत आहेत.
सुफियांन असलम शेख (वय 20 वर्ष, रा, कोणतं चौक, पूर्व मंगळवार पेठ, सोलापूर) असे आरोपी मुलाचे नाव आहे. तर जरीना अस्लम शेख (वय 43 वर्ष, रा, कोणतंम चौक, पूर्व मंगळवारपेठ, सोलापूर) असे जखमी आईचे नाव आहे.मंगळवारी सकाळी आई जरीना झाडू मारत होती;
मुलाने केला हल्ला 4 ऑक्टोबर रोजी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास जरीना शेख या राहत्या घरी, सकाळी रोजच्या प्रमाणे झाडू मारत होत्या. मनोरुग्ण सुफीयान शेख हा आईवर अज्ञात कारणावरून चिडून होता. घरात कोणी नसल्याची संधी साधत त्याने घरातील चाकु घेतले आणि, पाठीमागून येत आई जरीनावर जीवघेणा हल्ला केला.
मानेवर, पाठीवर, व कम्बरेंवर असे तीन वेळा भोकसले आणि तेथून पळ काढला. मधला मारुती, बेगम पेठ या मार्गावरून जेलरोड पोलीस ठाण्यात स्वतःहुन हजर झाला. पोलिसांना माहिती देत सांगितले की, आईवर चाकु ने वार केले. जेलरोड पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे.
0 Comments