google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सोलापूर ते दिल्ली...साप्ताहिंक रेल्वे उद्या पासून सुरु

Breaking News

सोलापूर ते दिल्ली...साप्ताहिंक रेल्वे उद्या पासून सुरु

 सोलापूर ते दिल्ली...साप्ताहिंक रेल्वे उद्या पासून सुरु

 आतापर्यंत केवळ केके अर्थात अवलंबून होते पण आता

 सोलापूरकर व इतर प्रवासी दिल्लीला जाण्यासाठी कर्नाटक एक्स्प्रेसवर हुबळी- हजरत निजामुद्दीन साप्ताहिक सुपरफास्ट एक्स्प्रेसला मंगळवार संसदीय कार्यमंत्री, कोळसा आणि खाणमंत्री प्रल्हाद जोशी व रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी हिरवा झेंडा दाखविला असून,ही गाडी सोलापूरमार्गे धावणार

 आहे. त्यामुळे सोलापूरकरांसाठी नवी दिल्लीला जाण्यासाठी आणखी एक गाडी उपलब्ध झाल्याने सोलापूरकरांची सोय होणार आहे.

 ही प्रस्तावित रेल्वे हुबळी येथून 20657 या क्रमांकाने शुक्रवार दि. 14 रोजी रात्री 11.50 वाजता निघेल व हजरत निजामुद्दीन स्थानकावर रविवारी दि. 16 रोजी सकाळी 10.40 वाजता पोचेल. तसेच

हजरत निजमुद्दीन स्थानकावरून 20658 या क्रमांकाने रविवार दि. 16 दुपारी 3.55 वाजता सुटेल. या रेल्वेगाडीला एकूण 22 एलएचबी डबे असणार आहेत. 

त्यामुळे सोलापूरकरांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे. सदर गाडी हुबळी येथून शुक्रवारी रात्री 11 वाजून 50 मिनिटांनी सुटेल. गदग रात्री एक वाजता, बदामी रात्री 2.12, बागलकोट रात्री 2.53, विजयपूर पहाटे 5.25 तर

सोलापूरला सकाळी 8 वाजून 35 मिनिटांनी पोहचेल. पाच मिनिटांचा थांबा घेऊन 8 वाजून 40 मिनिटांनी कुर्डुवाडीकडे रवाना होईल. कुर्डुवाडी सकाळी 9.40, दौंड 11.10, अहमदनगर दुपारी 12.35, कोपरगाव, मनमाड, भुसावळ खांडवा, इटारसी, राणी कमलापती (भोपाळ), बिना, वीरांगना लक्ष्मीबाई जंक्शन (झांशी), ग्वाल्हेर, 

आग्रा आदी ठिकाणी थांबा घेऊन ही गाडी रविवारीसकाळी निजामुद्दीनला 10.40 वाजता पोचणार आहे. तर निजामुद्दीन येथून रविवारी दुपारी 3 वाजून 55 मिनिटांनी गाडी निघेल. आग्रा, ग्वाल्हेर, वीरांगना लक्ष्मीबाई जंकशन ( झांशी), बिना, राणी कमलापती (भोपाळ), इटारसी, खंडवा, भुसावळ, मनमाड, कोपरगाव सकाळी 10.18, अहमदनगर दुपारी 12.10, दौंड 4.25, कुर्डुवाडी 5.53 तर सोलापूरला सायंकाळी सात वाजता येईल.

Post a Comment

0 Comments