चिमुकल्याला खेळता- खेळता श्वास घेता येईना , डॉक्टराकडे नेले एक्सरे बघुन पालक हादरले
बुलडाणा : तुमच्या घरात जर लहान मुलं असतील तर त्यांच्याकडे नीट लक्ष द्या. चुकूनही त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नका. कारण, बुलडाणा जिल्ह्यात एक अशी घटना घडली, जी वाचून तुमच्याही अंगावर काटा येईल.
जिल्ह्यातील शेगाव येथे एका चिमुकल्याला अचानक खेळता-खेळता श्वसनाचा त्रास सुरू झाला. ही गोष्ट पालकांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने त्याला रुग्णालयात दाखल केलं.
डॉक्टरांनी या चिमुकल्याचा एक्सरे काढला. एक्सरे पाहून डॉक्टरांसह चिमुकल्याच्या पालकांच्याही पायाखालची जमीन सरकली. आशिर मोहम्मद आमिर असं साडेतीन वर्षीय चिमुकल्याचं नाव आहे. आशिरने नकळकत खेळता-खेळता १ रुपयांचं नाणं गिळलं होतं. डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांमुळे त्याला वाचवण्यात यश मिळालं.
शेगाव शहरात राहणाऱ्या मोहम्मद आमिर यांच्या साडेतीन वर्षीय चिमुकल्याला खेळताना अचानक श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यानंतर आमिर यांनी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केलं. तेथे डॉक्टरांनी एक्सरे काढला असता, आशिरने १ रुपयांचं नाणं गिळलं असल्याचं लक्षात आलं.


0 Comments