google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगली-मिरज-सोलापूरला होणारे अत्यंत अवघड गुंतागुंतीचे ऑपरेशन सांगोल्यातील वेदांत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये संपन्न

Breaking News

सांगली-मिरज-सोलापूरला होणारे अत्यंत अवघड गुंतागुंतीचे ऑपरेशन सांगोल्यातील वेदांत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये संपन्न

सांगली-मिरज-सोलापूरला      होणारे अत्यंत                  अवघड गुंतागुंतीचे ऑपरेशन   सांगोल्यातील वेदांत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये संपन्न...

सांगोला प्रतिनिधी- सांगोला तालुक्यातील ग्रामीण भागातील एक सर्व सामान्य शेतकरी त्यांच्या उदरनिर्वाहाच साधन म्हणजे फकत शेतीच....अश्या या शेतकऱ्याचा अपघात २ ऑक्टोबर रोजी झाला होता. या अपघातात त्याच्या उजव्या पायाच्या खुब्याला गंभीर दुखापत झाली होती

 व अन्य ठिकाणी सौम्य मुका मार लागून जखमा ही झाल्या होत्या.प्रथमदर्शनी जवळच्या डॉक्टरांनी त्याच्यावर प्राथमिक उपचार केले व उजव्या खुब्यातील हाडाचे   ( Acetabulum चे ) फ्रॅक्चर झाल्याची कल्पना दिली. खुब्यातील हाडाच्या या फ्रॅक्चर साठी ऑपरेशन करण्याचे सुचवले परंतु हे ऑपरेशन सांगली-मिरज सारख्या शहरामध्ये जाऊन ऑपरेशन करण्याचा सल्ला दिला.

रुग्णाचे नातेवाईक रुग्णाला घेऊन सांगली सारख्या मोठ्या सेंटर ला पोहोचले तिथे त्यांना ऑपरेशन साठी भला-मोठा खर्च  सांगितला.हतबल झालेले नातेवाईक  यांनी पैश्याची जुळवाजुळवं  करू लागले परंतु या प्रसंगी त्यांना पैश्याची आर्थिक चणचण भासू लागली.

ऑपरेशन तर करणे गरजेचे होते यामध्ये रुग्णाच्या जीवन मरणाचा प्रश्न होता त्यासाठी रुग्णाचे नातेवाईक यांनी सर्व हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन संदर्भात चौकशी सुरू केली.चौकशी अंती त्यांना समजले की आपल्या सांगोला मध्ये  ही वेदांत हॉस्पिटलमध्ये ह्या प्रकारचे गुंतागुंतीचे ऑपरेशन होऊ शकते त्यांनी 

वेदांत हॉस्पिटल चे डायरेक्टर डॉ.अण्णासो लवटे यांच्याशी चर्चा केली. डॉ अण्णासो लवटे यांनी हॉस्पिटलचे अस्थीरोग तज्ञ डॉ.अक्षय मरगळे व  हॉस्पिटल टीम यांच्याशी चर्चा करून सदरच्या रुग्णाचे ऑपरेशन नीट व्यवस्थित  पार पाडू अशी हमी रुग्णाच्या नातेवाईक यांना दिली.रुग्णाचा व नातेवाईक यांनी  विश्वास ठेवून

 वेदांत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये Acetabulum म्हणजेच खुब्यातील हाडाचे फ्रॅक्चरचे ऑपरेशन करण्याचे ठरवले. सदरचा रुग्ण ४ ऑक्टोबर रोजी वेदांत हॉस्पिटलमध्ये दाखल झाला.वेदांत हॉस्पिटल चे अस्थीरोग तज्ञ डॉ.अक्षय मरगळे व बीड चे सुप्रसिद्ध अस्थीरोग तज्ञ डॉ.गणेश डोळे यांच्या देखरेखीखाली ५ ऑक्टोबर ला या रुग्णावर शस्त्रक्रिया व्यवस्थित पार पडली.

या शस्त्रक्रियेसाठी सांगोल्या चे भूलतज्ञ डॉ.सुरेश वरशेट्टी यांची मोलाची साथ मिळाली.सांगोला तालुक्यामध्ये प्रथमच अत्यंत अवघड अश्या समजल्या जाणाऱ्या      Acetabulum म्हणजेच खुब्यातील हाडाचे यशस्वी ऑपरेशन

 वेदांत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये एकत्रीत महात्मा फुले जनआरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना यांच्या मार्फत मोफत करण्यात आले.रुग्णाला शस्त्रक्रियेनंतर ७ दिवसांनी डिस्चार्ज देण्यात आला , रुग्ण व रुग्णाचे नातेवाईक यांनी वेदांत हॉस्पिटलचे मनपुर्वक आभार मानले

 या वेळी  अस्थीरोग तज्ञ डॉ. गणेश डोळे ,अस्थीरोग तज्ञ डॉ. अक्षय मरगळे  व वेदांत हॉस्पिटल ची सर्व टीम ,डायरेक्टर्स, डॉक्टर्स, नर्सिंग स्टाफ ,वैद्यकीय कर्मचारी उपस्थित होते.वेदांत हॉस्पिटल अश्या प्रकारचे अत्यंत अवघड शस्त्रक्रिया करण्यासाठी सज्ज आहे असे आश्वासन हॉस्पिटल चे डायरेक्टर डॉ.परेश खंडागळे यांनी दिले व सर्वांचे आभार मानले*

Post a Comment

0 Comments