google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 आता शालेय प्रवास खर्चासाठी मिळणार पैसे शासनाचा नवा निर्णय - योजना

Breaking News

आता शालेय प्रवास खर्चासाठी मिळणार पैसे शासनाचा नवा निर्णय - योजना

 आता शालेय प्रवास खर्चासाठी मिळणार पैसे शासनाचा नवा निर्णय - योजना

आपल्या मुलांना शाळेत ने आन करण्यामध्ये पालकांचा मोठा प्रमाणत खर्च होती ही बाब शासनाने लक्षात घेता नवा निर्णय घेतला आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना एका वर्षासाठी 6 हजार रुपये प्रवास खर्च मिळणार आहे. विशेषत ग्रामीण भागातील विद्यार्थी यांना शाळे पर्यंत जाण्यासाठी बस टॅक्सी किंव्हा इतर पर्यायी वाहनांचा वापर करावा लागत असे. आता या निनर्यामुळे त्यांना थोडी मदत मिळणार आहे.

ज्या शाळांची मान्यता रद्द करण्यात आली आहे आणि ज्या शाळा बंद झाल्या आहेत, अशा विद्यार्थ्यांना इतर शाळांमध्ये सामावून घेतले जाईल. ज्या विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी आई किंवा वडील नाहीत, त्यांना एकरकमी पैसे देण्यात येणार आहे.

वीसपेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांची मान्यता रद्द करून त्या शाळांमधील विद्यार्थ्यांना अन्य शाळांमध्ये सामावून घेण्याचा नियम आहे. त्यानुसार राज्यात अशा विद्यार्थ्यांची संख्या निश्चित करण्यात आली असून ज्या विद्यार्थ्यांचे पालक नाहीत किंवा त्यांच्यासोबत राहत नाहीत अशा विद्यार्थ्यांची वर्गवारी करण्यात येणार आहे. त्या विद्यार्थ्यांना शाळेत जाताना प्रवास खर्चाचा सामना करावा लागू नये म्हणून त्यांना दरमहा ६०० रुपये दिले जातील. त्यासाठी आधारशी लिंक केलेल्या बँक खात्याची माहिती अद्ययावत करून डिसेंबरपर्यंत ही माहिती पूर्ण केली जाणार असून, जानेवारीत विद्यार्थ्यांना ही रक्कम वितरित करण्याचे आदेश शालेय शिक्षणमंत्र्यांनी दिले आहेत.

ग्रामीण भागातील विद्यार्थी जास्त

शालेय व क्रीडा विभागाकडून ग्रामीण भागातील प्राथमिक शाळांमध्ये शिकणाऱ्या 15,088 विद्यार्थ्यांसाठी 9 कोटी 5 लाख 88 हजार रुपये, शहरी भागातील 3,874 विद्यार्थ्यांसाठी 2 कोटी 32 लाख 74 हजार रुपये आणि माध्यमिक शिक्षण घेणाऱ्या 744 विद्यार्थ्यांसाठी 44 रुपये इतकी रक्कम आहे. शिक्षणासाठी 64 हजार मंजूर झाले आहेत. हा निधी 2022-23 या शैक्षणिक वर्षातील मुलांसाठी मंजूर करण्यात आल्याचा शासन आदेश जारी करण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments