सोलापूर : मुलाला विजेचा धक्का बसल्याने वाचवण्याकरता गेलेल्या शॉक लागून पिता पुत्राचा मृत्यू
सोलापुर विजेचा शॉक लागून पिता पुत्राचा मृत्यू झाल्याची घटना घडली.कपडे वाळवण्यासाठी घराच्या छतावर गेलेल्या मुलाला शॉक लागत असल्याचे पाहून त्याला वाचविण्यासाठी पित्याने धाव घेतली.
यावेळी ही घटना तुळजापूर तालुक्यातील खडकी या गावी रविवारी दुपारी घडली. सचिन शाम भंडारे (वय ३५) आणि जय सचिन भंडारे (वय 11) अशी मरण पावलेल्यांची नावे आहेत.
जय भंडारे हा खडकी येथील घरावर कपडे वाळवण्यासाठी गेला होता. त्याच्या घरावरून महावितरणची मुख्य तार गेली आहे. ओले कपडे भिंतीवर टाकताना जय भंडारेच्या हाताला या तारेचा स्पर्श झाला. यामुळे जय जोरात किंचाळला. मुलाचा आवाज ऐकून पिता संजय भंडारे हे धावतच घरावरवर गेले. मुलाल विजेचा शॉक लागत आहे व त्यात तो भाजत आहे हे पाहून सचिन भंडारे यांनी आपल्या जीवाची परवा न करता मुलगा जयला बाजूला करण्याचा प्रयत्न केला.
विजेच्या तारेतून वीज प्रवाह वाहत असल्याने दोघेही पिता-पुत्रांना जोरदार शाॅक बसला व दोघेही घरावरून खाली पडले. या दोघांनाही उपचारासाठी सोलापूरच्या सिविल हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले होते. मात्र दोघांनाही डॉक्टरांनी मूर्त घोषित केले. याबाबत सिविल पोलीस चौकीत नोंद करण्यात आली आहे.


0 Comments