google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 डॉ. केळकर हॉस्पिटलच्या अद्यावत हॉस्पिटलचे तीन ऑक्टोबरला होणार उद्घाटन

Breaking News

डॉ. केळकर हॉस्पिटलच्या अद्यावत हॉस्पिटलचे तीन ऑक्टोबरला होणार उद्घाटन

 सांगोला येथील केळकर हॉस्पिटल येथे सुरू होणार पहिले टेस्ट ट्यूब बेबी सेंटर


 डॉ. केळकर हॉस्पिटलच्या अद्यावत हॉस्पिटलचे तीन ऑक्टोबरला होणार उद्घाटन

सांगोला : सांगोला तालुक्यातील वैद्यकीय क्षेत्रात केळकर कुटुंबीयांनी नवा मापदंड उभारला आहे. सोमवार दिनांक 3 ऑक्टोबर २०२२ रोजी सकाळी दहा वाजता डॉक्टर केळकर हॉस्पिटलच्या प्रशस्त, अत्याधुनिक सर्व सोयी सुविधांनी युक्त अशा नवीन इमारतीचे व या इमारतीमधील नवीन वंध्यत्व निवारण व तालुक्यातील पहिल्या टेस्ट ट्यूब बेबी सेंटरचे उद्घाटन आयोजित करण्यात आल्याची माहिती डॉक्टर रणजित केळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी डॉ. संजीवनी केळकर, डॉ सतिश केळकर,डॉ. सुपर्णा केळकर उपस्थित होते.

सदरचे उद्घाटन समारंभ ना. चंद्रकांत दादा पाटील उंच तंत्र शिक्षण आणि संसदीय मंत्री यांच्या हस्ते तर  अश्विनी रुग्णालय सोलापूर येथील प्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ सुमन सरदेसाई यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे. सांगोला येथे 1956 रोजी डॉ. दादा केळकर यांनी सरकारी नोकरीचा राजीनामा देऊन स्वतःचे खाजगी हॉस्पिटल सांगोल्यात बांधण्याचा निर्णय घेतला. रुग्णांच्या दुःखाला विराम आणि वेदनेला आराम हे त्यांचे ध्येय होते

 त्यासाठी तीस तीस किलोमीटरचे अंतर सायकलने कापून त्यांनी रुग्णांचे दुर्धर रोग आणि असाध्य व्याधी बऱ्या केल्या अनेकांना जीवनदान दिले. रुग्णसेवेसोबत त्यांनी समाजसेवा आणि राजकारण यांचाही मेळ घातला. त्यांच्या पत्नी चंपूताई या नर्स होत्या. त्यांनी आयुष्यभर दादांना साथ दिली आणि दोघांनी मिळून रुग्णसेवा आणि समाजसेवेच्या पायावर मानवतेचे मंदिर उभारले. 

त्यांच्या अंधत्वामुळे दादांना दवाखान्यातून निवृत्त व्हावे लागले. त्यांची धुरा डॉक्टर सतीश केळकर यांनी खांद्यावर घेतली. सांगोल्यातले पहिले एक्स-रे मशीन पहिले सोनोग्राफी मशीन तसेच रक्ताच्या प्राथमिक तपासण्या संपूर्ण तालुक्यात प्रथम सुरू झाल्या, त्या डॉक्टर सतीश केळकर यांच्या हॉस्पिटलमध्येच सुरू झाल्याने केळकर हॉस्पिटलचा नाव लौकिक आजही आहे.

डॉक्टर संजीवनी केळकर या सांगोला तालुक्यातील पहिल्या महिला डॉक्टर होय. रुग्णसेवा देत असताना ग्रामीण महिलांची लाथा बुक्क्यांची उन्हाळे आणि वेदनांची सोहळे यांनी जाणले, आणि रुग्णसेवे सोबत या दुष्काळी तालुक्यात १९७८ मध्ये माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठान ही महिलांची संस्था स्थापन करून समाजसेवेचे वृत्त घेतले . 

ग्रामीण महिलांचे सबलीकरण आणि ग्रामीण विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण आणि जलसंधारण या तीन कामात त्यांनी लक्ष दिले.  योजना उपक्रम राबवून त्यांनी तालुक्यात स्त्रियांच्या परिवर्तनाची चळवळ सुरू केली.या संस्थेच्या माध्यमातून आजपर्यंत त्यांच्यामुळे हजारो महिलांच्या चेहऱ्यावर स्मित उमलले आहे.नुकताच त्यांना मृत्युंजय प्रतिष्ठानचा सामाजिक कार्याबाबतचा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

 डॉ. रणजीत व डॉ. सुपर्णा केळकर यांनी केळकर हॉस्पिटलमध्ये अद्यावत सुविधा निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. आज उभारलेले तीन मजली हॉस्पिटल व टेस्ट ट्यूब बेबी सेंटर मुळे केळकर हॉस्पिटल मध्ये अत्यल्प दरात रूग्णांना फायदा होणार आहे.

 ग्रामीण भागात आपला मानस होता की तालुक्यातील रुग्णासाठी टेस्ट ट्यूब बेबी सेंटर चालू करावे, आणि प्रत्यक्षात ते सेंटर चालू होत आहे. अतिशय कमी खर्चात आणि उत्कृष्ठ सेवा देण्याचा आमचा प्रयत्न आहे. सांगोला तालुक्यासह आसपासच्या तालुक्यांतील रुग्णांना याचा मोठा फायदा होणार आहे.  ::डॉ रणजित केळकर  

Post a Comment

0 Comments