google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 आठ महिन्याच्या बाळाने गिळली‘हि’ वस्तू; एक्स-रे रिपोर्ट पाहताच आई वडील झाले आश्चर्य!

Breaking News

आठ महिन्याच्या बाळाने गिळली‘हि’ वस्तू; एक्स-रे रिपोर्ट पाहताच आई वडील झाले आश्चर्य!

 आठ महिन्याच्या बाळाने गिळली‘हि’ वस्तू; एक्स-रे रिपोर्ट पाहताच आई वडील झाले आश्चर्य!

मालेगाव : नाशिक रोडच्या के जी मेहता या परिसरात सोमवारी एका आठ महिने वय असलेल्या बाळाच्या हाताला एक वस्तू लागली. सवयीप्रमाणे चिमुकल्यानं तोंडात घातली. त्यांनतर त्याने ती गिळूनही टाकली. दरम्यान, जेव्हा त्याची तब्बेत बिघडली आणि चिमुकल्याला डॉक्टरकडे घेऊन जाण्यात आलं, तेव्हा एक्स-रे रिपोर्टमधून चक्क नेलकटरच गिळल्याचे समोर आले. चिमुकल्या बाळाचे नाव आशिष होते.

चिमुकल्याचे पालक त्याला घेऊन जिल्हा रुग्णालयात आले होते. पण तिथे काही ऑपरेशन करणे शक्य नव्हतं. अखेर जिल्हा रुग्णालयातल्या डॉक्टरांनी मुलाला मेडिकल कॉलेजमध्ये नेण्याचा सल्ला दिला.

दरम्यान,  साधरण काल रात्री कॅज्युलिटीमधून डॉक्टरांना इमर्जन्सी फोन आला. मेडिकल कॉलेजमधील डॉ. हेमंत आणि एनेस्थेशिया टीमने ऑपरेशनला सुरुवात केली. पुढच्या दातांपासून 22 सेंटीमीटर अंतरावर असलेलं हे नेलकटर अडकलं होतं. दुर्बिणीच्या साहाय्याने डॉक्टरांनी हे ऑपरेशन केलं आणि नेलकटर बाहेर काढलं, अशी माहिती डॉक्टरांनी दिलीय. 

Post a Comment

0 Comments