google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 धक्कादायक |अंतरजातीय विवाह केलेल्या एका 22 वर्षीय विवाहितेला डिझेल ने पेटवलं..

Breaking News

धक्कादायक |अंतरजातीय विवाह केलेल्या एका 22 वर्षीय विवाहितेला डिझेल ने पेटवलं..

 धक्कादायक |अंतरजातीय विवाह केलेल्या एका 22 वर्षीय विवाहितेला डिझेल ने पेटवलं..

धक्कादायक |डिझेल ने विवाहितेला पेटवल

6 महिन्यापूर्वी अंतरजातीय विवाह केलेल्या एका 22 वर्षीय विवाहितेला नवर्‍याने पेटून दिल्याची धक्कादायक घटना वडवणी शहरातील साळींबा रोडवर घडली आहे. गंभीर भाजलेल्या विवाहितेवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असून पोलिसांनी तीचा जवाब नोंदवला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शेख अंजुम शेख युसुब (वय 22 वर्षे, रा. माजलगाव) हीचा गेल्या काही वर्षापूर्वी औरंगाबाद येथील तरुणाशी विवाह झाला होता. त्यांना एक मुलगा आहे. सुखी संसार सुरु असतांना अंजुमच्या पतीचे अपघातात निधन झाले. तेव्हापासून अंजुम ही आपल्या आई- वडिलासोबत माजलगावात राहत होती. त्यानंतर तीचे आई- वडील हे उपळी ता. वडवणी येथील बळीराम राजाभाऊ इचके यांच्या सोबत उसतोडणीला जात होते.

 अंजुमही त्यांच्या सोबत उसतोडणीला जावू लागली. त्या दरम्यान अंजुम आणि बळीराम इचके यांची ओळख झाली. अन् ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. गेल्या सहा महिन्यापूर्वी त्यांनी अंतरजातीय विवाह केला. अन् ते वडवणी शहरातील साळींबा रोड येथे किरायाच्या घरात राहू लागले. बळीराम इचके याचही यापूर्वी लग्न झालेले आहे. त्याला दोन मुले आहेत. 15 सप्टेंबर रोजी दोघांमध्ये किरकोळ वाद झाला अन् इचके याने अंजुम हीच्या अंगावर डिझेल टाकून पेटून दिले. गंभीर भाजलेल्या अंजूमवर सध्या जिल्हारुग्णालयात उपचार सुरु असून वडवणी पोलिसांनी तीचा जवाब घेतला आहे.

Post a Comment

0 Comments