सांगोला आकर्षक व्याज परताव्याचं वेबसाईटवर आमिष , दोघा व्यावसायिकांकडून अकरा लाखाची फसवणूक....
सांगोला वेबसाईटवर सोलवपे इन कंपनीकडे ३५०० रुपयांची गुंतवणूक केल्यास दररोज ६ टक्के व्याज दराने १४० दिवसांत १४ हजार ७०० रुपये परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून चोपडी ( ता . सांगोला ) येथील दोघा व्यवसायिकांना १५ लाख गुंतवायला लावले . त्यापोटी कंपनीने तत्काळ दोघा व्यापाऱ्यांना ३ लाख ६५ हजार ३१५ रुपयांचा परतावा देऊन विश्वास संपादन केला .
मात्र आठवडाभरात कंपनीकडून ११ लाख ४० हजार ८७८ रुपयांची फसवणूक झाल्याचे पुढे आले .याबाबत व्यवसायिक प्रवीण गजानन चौगुले ( रा . चोपडी ) यांनी सोलवपे वेबसाईटच्या शर्मा नामक अॅडमिन विरोधात सांगोला पोलिसांत फिर्याद दिली आहे .
व्यावसायिक प्रवीण चौगुले यांचा व्यावसायिक मित्र प्रमोद कचरे यांना वेबसाइटवरील सोलवपे इन कंपनीकडे ३५०० रुपयांची गुंतवणूक केल्यास 3 टक्के व्याज दराने १४ हजार ७०० रुपये मिळणार असल्याचे दर्शवले होते . त्यानुसार त्यांनी पैसे भरले आणि कचरे यांनी ती माहिती प्रवीण चौगुले यांना दिली . या वेबसाइटवर शर्मा नामक... अन् वेबसाईटचे लॉगईन पेज बंद झाले दरम्यान , १४० दिवसांसाठी गुंतवणूक केलेल्या रकमेवर दररोज परतावा मिळणे आवश्यक होते .
मात्र , १५ सप्टेंबरपासून त्यांना परतावा मिळणे बंद झाले . त्या वेबसाईटचे लॉग इन पेज बंद झाले . त्यांनी कंपनीच्या मोबाईलवर संपर्क साधला असता तेही बंद लागले . व्यक्तीने व्हॉट्सअॅप ग्रुप तयार करून प्रमोद कचरे यांचा मोबाईल नंबर समाविष्ट केला . दररोज ६ टक्के व्याजाने १४०दिवसांत ८ लाख ४० हजार रुपये मिळणार असे सांगितले गेले .
१४० दिवसांत वेगवेगळ्या टक्केवारीचे आमिष दाखवल्याने या कंपनीबाबत विश्वास वाटला . ८ सप्टेंबर २०२२ ते १४ सप्टेंबर २०२२ दरम्यान प्रमोद कचरे यांनी ४ लाख ५१ हजार रुपयांची विविध योजनेत गुंतवणूक केली . त्याप्रमाणे त्यांना ९ १ हजार ३१५ रुपयांचा परतावा मिळाला . तसेच चौगुले यांनी त्या कंपनीत १० लाख ५५ हजार रुपयांची गुंतवणूक केली . त्याप्रमाणे त्यांनाही २ लाख ७३ हजार ८०७ रुपयांचा परतावा मिळाला .


0 Comments