google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 अखिल भारतीय माळी महासंघ, सोलापूर माळी समाजाचा राज्यस्तरीय,सर्व शाखीय १६ ऑक्टोबर रोजी वधू-वर व पालक परिचय मेळावा

Breaking News

अखिल भारतीय माळी महासंघ, सोलापूर माळी समाजाचा राज्यस्तरीय,सर्व शाखीय १६ ऑक्टोबर रोजी वधू-वर व पालक परिचय मेळावा

 अखिल भारतीय माळी महासंघ, सोलापूर माळी समाजाचा राज्यस्तरीय,सर्व शाखीय १६ ऑक्टोबर रोजी वधू-वर व पालक परिचय मेळावा

सोलापूर :  सध्याच्या धकाधकीच्या जीवनात वेळ,पैसा व मानसिक त्रास वाचविण्यासाठी अखिल भारतीय माळी महासंघ, सोलापूर यांचेवतीने रविवार दि.१६ ऑक्टोबर २०२२ रोजी सकाळी १० वा.एकाच ठिकाणी शेकडो वधू-वर पालक यांचा राज्यस्तरीय, सर्व शाखीय माळी समाज परिचय मेळावा संत शिरोमणी सावता महाराज तिर्थ क्षेत्र अरण (ता. माढा,जि.सोलापूर) येथे आयोजित करण्यात आला आहे.

त्यासाठी इच्छुक वधू-वरांच्या पालकांनी वधू-वर परिचय नोंदणी फॉर्म दि.१२ ऑक्टोबर पर्यंत भरून 7387377801 या व्हाॅट्सअप वर किंवा अखिल भारतीय माळी महासंघ (८,बावी प्लाझा एस.टी. स्टॅन्ड समोर,सोलापूर) कार्यालयात द्यावेत. फॉर्म मागणी केल्यास आपल्या व्हाॅट्सअप नंबरवर पाठविले जातील.प्रथम,घटस्फोटीत, विधवा, विधूर,अपंग,वधू-वर यांची नोंदणी घेण्यात येईल.

www. abmmahasangh.org या महासंघाच्या अधिकृत वेबसाइटवर सुद्धा ऑनलाईन नोंदणी घेण्यात येईल .

या मेळाव्यात समाजासाठी घेण्यात येणार्‍या विविध मागण्यांचे ठराव :

संत शिरोमणि सावता महाराज संजीवन समाधी तीर्थ क्षेत्र अरणला अ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा द्यावा.

जातनिहाय जनगणना करावी. जातनिहाय जनगणना करण्यास जे पक्ष विरोध करतील,त्या पक्षांना ओबीसी मतदान करणार नाहीत.

या मागण्यांचे ठरावही करण्यात येणार असून फॉर्म नोंदणी लवकरात लवकर करावी, कार्यक्रमाच्या ठिकाणी नाष्टा,चहापाणी व जेवणाची व्यवस्था केलेली आहे. नोंदणी करणाऱ्यास PDF पुस्तक कॉपी व्हाॅट्सअप वर मिळेल. अशी माहिती राष्ट्रीय अध्यक्ष शंकरराव लिंगे यांनी दिली आहे.

Post a Comment

0 Comments