google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सोलापुरात ' त्या ' आमदारांच्या प्रतिमांची गाढवावरून धिंड ! ज्या हातांनी पुष्पहार अर्पण केले त्याच हातांनी शिवसैनिकांनी मारले जोडे आणि केला जोरदार निषेध .... !

Breaking News

सोलापुरात ' त्या ' आमदारांच्या प्रतिमांची गाढवावरून धिंड ! ज्या हातांनी पुष्पहार अर्पण केले त्याच हातांनी शिवसैनिकांनी मारले जोडे आणि केला जोरदार निषेध .... !

 सोलापुरात ' त्या ' आमदारांच्या प्रतिमांची गाढवावरून धिंड ! ज्या हातांनी पुष्पहार अर्पण केले त्याच हातांनी शिवसैनिकांनी मारले जोडे आणि केला जोरदार निषेध .... !

सोलापुरात रामदास कदम, गुलाबराव पाटील आणि शहाजीबापू पाटील यांच्या पोस्टरची गाढवावरून धिंड ; जोडे मारून नोंदवला निषेध

सोलापूर - ( प्रतिनिधी ) - शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे रश्मीताई ठाकरे तसेच युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यावर शिवसेनेतून फुटून शिंदे गटात गेलेले रामदास कदम ,गुलाबराव पाटील आणि शहाजीबापू पाटील यांच्याकडून सातत्याने चुकीची आणि बदनामीकारक वक्तव्य करण्यात येत आहेत. 

आता तर ठाकरे घराण्याच्या स्नुषा रश्मीताई ठाकरे यांच्यावरच खालच्या भाषेत टीका करायला सुरुवात केली आहे. याच्या निषेधार्थ शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख अनिल कोकीळ यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गणेश वानकर यांच्या  नेतृत्वाखाली बुधवारी उत्तर सोलापूर तालुक्यातील पाकणी तसेच मोहोळ आणि मंगळवेढा तालुक्यातील मरवडे येथे रामदास कदम ,गुलाबराव पाटील आणि शहाजीबापू पाटील यांच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात आले. या तिघांचे पोस्टर गाढवाच्या गळ्यात घालून धिंड काढण्यात आली. तसेच त्यांच्या पोस्टरला जोडेही मारण्यात आले.

रामदास कदमचं करायचं काय ,खाली मुंडी वर पाय ,नीम का पत्ता कडवा है, रामदास कदम भडवा है, अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.

 यावेळी बोलताना शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गणेश वानकर म्हणाले,राजकारणात वाद - प्रतिवाद, आरोप - प्रत्यारोप होत राहतात. प्रत्येक पक्ष आणि प्रत्येक नेता आपली बाजू जोरदारपणे मांडण्याचा प्रयत्न करतो आणि त्यासाठी विविध प्रकारचे युक्तिवादही करतो. रामदास कदम सारखा माणूस शिवरायांचा मावळा किंवा शिवसैनिक तर दूरच, परंतु तो कुणाचाही मुलगा किंवा भाऊ म्हणून घेण्याच्या ही लायकीचा असू शकत नाही. अशा माणसाला शिवसेना राज्यात फिरू देणार नाही,असा इशारा जिल्हाप्रमुख वानकर यांनी दिला.

शिवसेना जिल्हाप्रमुख गणेश वानकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनाप्रसंगी महिला आघाडी जिल्हा संघटिका सीमाताई पाटील, उपजिल्हाप्रमुख विक्रांत काकडे, तुकाराम भोजने, दादासाहेब पवार, तालुकाप्रमुख अशोक भोसले, तुकाराम कुदळे, युवा सेना जिल्हाप्रमुख महेश देशमुख, य शिवसेनेचे सर्व उपतालुकाप्रमुख ,विभाग प्रमुख ,उपविभाग प्रमुख, शाखाप्रमुख, शिवसैनिक व शिवसेना अंगीकृत संलग्न संघटनेचे इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments