google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 कुणाच्या लक्षात येवू नये म्हणून तो बुरखा घालून प्रेयसीला भेटायला गेला आणि लोकांनी मुलं पळवणारा चोर समजून धु धू धुतले

Breaking News

कुणाच्या लक्षात येवू नये म्हणून तो बुरखा घालून प्रेयसीला भेटायला गेला आणि लोकांनी मुलं पळवणारा चोर समजून धु धू धुतले

 कुणाच्या लक्षात येवू नये म्हणून तो बुरखा घालून प्रेयसीला भेटायला गेला आणि लोकांनी मुलं पळवणारा चोर समजून धु धू धुतले

 कुणाच्या लक्षात येवू नये म्हणून तो बुरखा घालून प्रेयसीला भेटायला गेला आणि लोकांनी मुलं पळवणारा चोर समजून धु धू धुतले असल्याची वेगळीच घटना समोर आली आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात मुले पळवणारी टोळी आल्याची अफवा पसरली आहे. राज्याच्या विविध भागात अशी अफवा पसरली असून कुणी अनोळखी व्यक्ती दिसली की त्याच्याकडे संशयाने पहिले जात आहे. मुले पळविणाऱ्या टोळीत महिला असून त्या बुरखा पांघरून येतात आणि मुलांना पळवून नेतात अशी केवळ अफवा पसरली आणि राज्यातील पालक अकारण धास्तावून गेले आहेत. 

सोशल मीडियावर या नसलेल्या टोळींचा मोठा बोलबाला असून व्हिडीओ आणि बुरख्यातील फोटो देखील व्हायरल होऊ लागले आहेत त्यामुळे नागरिकांच्या मनात असलेली ही भीती अधिकच गडद होत चाललेली आहे. अशी कुठलीही टोळी नसून ही केवळ एक अफवा आहे असे विविध पोलीस ठाण्यातील अधिकारी सांगत आहेत पण नागरिक मात्र धास्तावलेलेच आहेत.

कुणी अपरिचित व्यक्ती दिसली की तो मुले पळविणाऱ्या टोळीतील असल्याचा अंदाज बांधला जात आहे आणि त्याला बेदम मारहाण होऊ लागली आहे. त्या व्यक्तीची माहितीही घेतली जात नाही आणि स्थानिक पोलिसांनाही कळवले जात नाही त्यामुळे निरपराध व्यक्ती विनाकारण लोकांचा मार खावू लागला आहे. सांगली जिल्ह्यात अशाच गैरसमाजाने चार साधुना बेदम मारहाण करण्यात आली आणि मग तुरुंगात जाऊन बसावे लागले. 

राज्याच्या विविध भागात अशाच प्रकरच्या घटना घडू लागल्या असून कोठेही अस्तित्वात नसलेल्या टोळीने विनाकारण नागरिक आणि पालक चिंतेने ग्रासले आहेत.  त्यात सोशल मीडियावरून पसरल्या जात असलेल्या अफवा अधिक कारणीभूत ठरू लागल्या आहेत. या अफवामुळे निरपराध नागरिकांवर मात्र हल्ले होताना दिसत आहेत. 

आपल्या प्रेयसीला भेटायला गेलेल्याला देखील लोकांनी चोर समजून बेदम मारहाण केली आहे. कुणाला कळू नये आणि कुणाच्या लक्षात येवू नये म्हणून या प्रियकराने केलेली युक्ती त्याच्याच अंगलट आली. मुले पळवणारी महिलांची टोळी असून या महिला बुरखा घालून येतात अशी अफवा आधीच पसरलेली असल्यामुळे बुरखा घातलेल्या प्रत्येक महिलेकडे वेगळ्याच संशयाने पहिले जात आहे.

 त्यात हा तरुण प्रियकर कुणाला कळू नये म्हणून आपल्या प्रेयसीला भेटायला जाताना बुरखा घालून गेला. त्याला पाहताच लोक दक्ष झाले आणि मुले पळविणाऱ्या टोळीतील महिला समजून लोकांनी त्याला घेरले. कसलीही चौकशी न करता आणि काहीही माहिती न घेता लोकांनी त्याला बुकलून काढण्यास सुरुवात केली. लाथा बुक्क्यांनी आणि ज्याला जसे शक्य होते तसे त्याला धु धू धुतले !  नाशिकच्या वडाळा येथे ही घटना घडली.

बुरखाधारी तरुण ओरडत राहिला पण ना त्याची कुणाला दया आली, ना कुणी त्याचे काही ऐकून घेतले. मारहाणीत तो खाली पडला तरी देखील लोक त्याला तुडवतच राहिले. मोठ्या जमावाने या तरुणाला बेदम मारहाण केली. अशीच एक घटना सिडकोमधील एका चौकात घडली आहे. भीक मागणाऱ्या एका महिलेलाच मुले चोरणारी महिला म्हणून जमावाने बेदम मारले आहे. 

दोन दिवसांपूर्वीच गाडीतील पैशाची चोरी करण्याच्या हेतून आलेल्या दोघांना मुले पळविणारे म्हणून मोठी मारहाण झाली होती. राज्यात कुठेच अस्तित्वात नसलेली मुले पळविणारी टोळी सगळीकडेच धुडगूस घालताना दिसू लागली आहे. अशी कुठलीही टोळी नसून ही अफवा असल्याचे पोलीस सतत सांगत आहेत आणि अफवाव्र विश्वास न ठेवण्याचे आवाहन देखील करीत आहेत.

Post a Comment

0 Comments