google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 जनजागृती सेवा समितीच्यावतीने ग्रुपवरील प्रतिभावंत महिलांना ऑनलाईन"नवदुर्गा सन्मानपत्र"देऊन सन्मान. .. !

Breaking News

जनजागृती सेवा समितीच्यावतीने ग्रुपवरील प्रतिभावंत महिलांना ऑनलाईन"नवदुर्गा सन्मानपत्र"देऊन सन्मान. .. !

जनजागृती सेवा समितीच्यावतीने ग्रुपवरील प्रतिभावंत महिलांना ऑनलाईन"नवदुर्गा सन्मानपत्र"देऊन सन्मान. .. !

बदलापूर :-  स्त्री ही क्षणकाळाची पत्नी व अनंत काळाची माता आहे.तिला आई,बहीण,काकी,मुलगी,आत्या,मावशी,पत्नी,आजी अशी विविध नाती जोपासावी लागतात.स्त्री ही महिला दिन व नवरात्रोत्सवापुरती मर्यादित न रहाता वर्षाचे ३६५दिवस कार्यरत असते.स्त्री ही सृष्टीचे जीवन चक्र अविरतपणे चालु ठेवण्याचे कार्य करत आहे.

या नारी शक्तीचा सन्मान व्हावा म्हणून नवरात्रोत्सवाचे औचित्य साधुन जनजागृती सेवा समितीच्या ग्रुपवरील प्रतिभावंत महिलांचा ऑनलाईन"नवदुर्गा सन्मानपत्र"देऊन सन्मान केला.जनजागृती सेवा समितीच्या ग्रुपवर व्यावसायिक,सामाजिक संस्थाच्या अध्यक्षा,संचालिका,समाजसेविका,अभिनेत्री,वकील,डाॅक्टर,प्राध्यापिका,शिक्षिका,कवियत्री अशा विविध क्षेत्रात कार्य करणा-या"नवदुर्गा"कार्यरत आहेत."नारी तू घे अशी उंच भरारी,फिरून पाहू नकोस माघारी"!आजची स्त्री प्रत्येक क्षेत्रात प्रगतीपथावर आहे.

ग्रुपवरील सर्वच महिलांनी आपआपल्या क्षेत्रात कतृत्व सिध्द केले आहे.जनजागृती सेवा समिती,महाराष्ट्र या सामाजिक संस्थेने या महिलांना ऑनलाईन पध्दतीने"आकर्षक"नवदुर्गा"सन्मानपत्र देऊन संस्थचे अध्यक्ष गुरुनाथ तिरपणकर यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या. हा ऑनलाईन उपक्रम यशस्वी करण्यासाठी खजिनदार दत्ता कडुलकर व सचिव सौ.संचिता भंडारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments