google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 एक महिला सरपंच गायब ; पण पोलिसांच्या सतर्कतेने 48 तासांत सापडल्या

Breaking News

एक महिला सरपंच गायब ; पण पोलिसांच्या सतर्कतेने 48 तासांत सापडल्या

 एक महिला सरपंच गायब ; पण पोलिसांच्या सतर्कतेने 48 तासांत सापडल्या

एक महिला सरपंच गायब ; पण पोलिसांच्या सतर्कतेने 48 तासांत सापडल्या : सोलापुर : - बार्शी तालुक्यातील सौंदरे गावच्या सरपंच चार - पाच दिवसांपूर्वी अचानक गायब झाल्या होत्या . 

जिल्हा पोलिसांनी त्याची माहिती मिळताच यंत्रणाला तातडीने कामाला लागली आणि अवघ्या 48 तासांत त्या महिला सरपंचास शोधून काढले . रत्नागिरी जिल्ह्यातील पावस येथील आश्रमातून त्यांना पोलिसांनी आणून सुखरूप कुटुंबीयांच्या स्वाधीन केले .त्यांच्या गायब होण्याचे कारण मात्र कळू शकले नाही . एकीकडे सरपंच बांईंना शोधण्यात ग्रामीण पोलिसांना यश आले . 

पण , 20 दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या कवठे ( ता . उत्तर सोलापूर ) गावच्या सरपंच भाभींना शहर पोलिस शोधू शकले नाहीत , हे वास्तव आहे .सोशल मीडियातून आलेली माहिती पाहून रत्नागिरी जिल्ह्यातीले पावस येथील आश्रमात आश्रयाला थांबलेल्या सरपंच महिलेची माहिती तेथील काहींनी दापोली पोलिसांना दिली . 

त्यांनी संबंधित वर्णनाची महिला आश्रमात असल्याचे सांगितले . पोलिसांनी तेथे जाऊन पाहणी केली आणि त्या सौंदरे गावच्या सरपंच असल्याचे स्पष्ट झाले . दापोली पोलिसांनी सोलापूर ग्रामीण पोलिस अधीक्षकांशी संपर्क साधून त्यांना सुखरूप गावी आणले . ही सर्व प्रक्रिया पोलिसांनी अवघ्या 48 तासांत पर्ण केली .

Post a Comment

0 Comments