google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 3 ऑक्टोबर रोजी आर पी आय पक्षाचा वर्धापन दिन भुसावळ मध्ये साजरा होणार : तालुका अध्यक्ष सुरजदादा बनसोडे

Breaking News

3 ऑक्टोबर रोजी आर पी आय पक्षाचा वर्धापन दिन भुसावळ मध्ये साजरा होणार : तालुका अध्यक्ष सुरजदादा बनसोडे

 3 ऑक्टोबर रोजी आर पी आय पक्षाचा वर्धापन दिन भुसावळ मध्ये साजरा होणार : तालुका अध्यक्ष सुरजदादा बनसोडे


 आर पी आय आठवले पक्ष सभासद नोंदणी मुदत 15 ऑक्टोबर पर्यंत

सांगोला/(शब्दलेखा एक्सप्रेस न्यूज): 

 रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले या पक्षाची सभासद नोंदणी सुरू असून त्याचा एक भाग म्हणून सांगोला तालुक्यातून सभासद नोंदणी साठी उस्फुर्त प्रतिसाद मिळत असून काही आणखीन कार्यकर्त्यांना व हितचिंतकांना सभासद होण्याची इच्छा असेल त्यांना 15 ऑक्टोबर पर्यंत मुदत वाढवून दिली आहे 

तरी तालुक्यातील कार्यकर्त्यांनी सभासद होण्यापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घ्यावी अशा सूचना आर पी आय आठवले तालुका अध्यक्ष सुरजदादा बनसोडे यांनी दिल्या आहेत.  शिवाय 3 औक्टोबर रोजी आर पी आय आठवले पक्षाचा वर्धापन दिन भुसावळ येथे साजरा होणार आहे. 

तरी त्या कार्यक्रमाला जास्तीत जास्त कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आदेश राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री भारत सरकार रामदासजी आठवले साहेब यांनी दिले आहेत.   सदर कार्यक्रमाच्या नियोजनासाठी काल दि. 25 सप्टेंबर रोजी रविवारी पंढरपूर येथील शासकीय विश्राम गृहात बैठक पार पडली. यावेळी नंदकुमार केंगार यांची राज्य कार्यकारणी मध्ये आठवले साहेबांनी निवड केल्यामुळे त्यांचा सत्कार करण्यात आला.

 कमलापुरचे 2 वेळा ग्रामपंचायत सदस्य पप्पू ऐवळे यांनी आर पी आय पक्षामध्ये प्रवेश केला या वेळी जिल्हा अध्यक्ष अशोक नाना सरवदे, युवक जिल्हा अध्यक्ष यशपाल कांबळे, पश्चिम महाराष्ट्र संघटक अरुण आण्णा बनसोडे, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष नागेश कांबळे, युवक पश्चिम महाराष्ट्र संघटक सचिव दिपक चंदनशिवे तसेच  जिल्ह्यातील सर्व तालुका अध्यक्ष, युवक तालुका अध्यक्ष पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments