भोपाळ येथे 17 वी नॅशनल चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये साक्षी सरगर हिचे रौप्य पदक. गौडवाडी हायस्कुलची धावण्याच्या स्पर्धेत उतुंग भरारी
गौडवाडी प्रतिनिधी:-शशिकांत हातेकर
सोमवार दिनांक 19 9 2022 रोजी मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ येथे 17 वी नॅशनल चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये विद्यानिकेतन हायस्कूल गोडवाडी ता सांगोला येथील इयत्ता बारावी शिक्षण घेणारी विद्यार्थिनी कुमारी साक्षी संगाप्पा सरगर हिने रौप्य पदक मिळवून तिची निवड आशियाई स्पर्धेत कुवेत येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी निवड झाली आहे
ती ग्रामीण भागात राहून एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील मुलगी असून आत्मविश्वास आणि जिद्द या जोरावर तिनेही यशाची उत्तुंग भरारी मारली आहे तीचे मार्गदर्शक शिक्षक चंदनशिवे सर देशमुख सर यांचे मोलाच्या मार्गदर्शन लाभले ही सध्या पंढरपूर या ठिकाणी प्रशिक्षक चेतन धनवडे यांच्या मार्गदर्शना खाली प्रशिक्षण घेत आहे
तेही उत्तम प्रकारचे प्रशिक्षक आहेत ती सध्या बेंगलोर या ठिकाणी अधिक कोचिंग साठी जाणार आहे त्याचप्रमाणे तिचे पालक स्वतः उत्तम धावापटू नामदेव सरगर व वडील संगाप्पा सरगर यांचे उत्तम प्रकारे मार्गदर्शन लाभले आहे आज दिनांक 21 .9 .2022 रोजी संस्था सचिव माननीय नारायण बापू शेंडगे व प्राचार्य माळी सर यांनी शाळेवर बोलावून येतोचित सत्कार करून पुढील प्रशिक्षणासाठी फूल फुलाची पाकळी म्हणून आर्थिक मदत केली.
बलवाडी गावचे उल्हास धायगुडे यांनी भरघोस मदत केली व उपसरपंच माननीय पोपट गडदे यांनी मदतीची घोषणा करतात केली असता गावातील सर्व व्यक्तीने मदत केली सत्कारासाठी माननीय माजी सरपंच शिंगाडे व माजी तंटा मुक्त अध्यक्ष आनंदा गडदे, यशवंत गडदे महादेव आलदर असे अनेक मान्यवर तसेच शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी ग्रामस्थ उपस्थित होते सर्वांनी तिला पुढील स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या
तिचे वडील सध्या दुसऱ्याचे शेतामध्ये काम करत आहेत घरची परिस्थिती अत्यंत हलकीच्या असून सध्या तिला पुढील प्रशिक्षणासाठी आर्थिक मदतीची खूप गरज आहे रत्न खाणीतून निघते तसेच ती एक अत्यंत गरीब कुटुंबातील जिद्दी मुलगी असून अंगी काहीतरी करून दाखवण्याची उर्मी अंगामध्ये तिची आहेतिचे पालक एक अशिक्षित खेड्यातील मजूर कामाचे काम करतात तरी दानशूर व्यक्तीने सढळ हाताने मदत करावी अशी अपेक्षा आहे. बाळुमामा सरगर हा तिचा भावाचा फोन पे नंबर आहे ह्या वरती मदत करावी 8237904801



0 Comments