google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला शहरात प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत 170 घरे पूर्ण " सेवा पंधरवडा" अंतर्गत लाभार्थ्यांना प्रलंबित निधीचे वितरण !

Breaking News

सांगोला शहरात प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत 170 घरे पूर्ण " सेवा पंधरवडा" अंतर्गत लाभार्थ्यांना प्रलंबित निधीचे वितरण !

 सांगोला शहरात प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत 170 घरे पूर्ण " सेवा पंधरवडा" अंतर्गत लाभार्थ्यांना प्रलंबित निधीचे वितरण !

देशातील प्रत्येक कुटुंबाला पक्के घर असायला हवे ह्या हेतूने शहरातील गरिबांसाठी "प्रधानमंत्री आवास(शहरी)" या योजनेची सुरुवात डिसेंबर 2015 रोजी करण्यात आली होती. केंद्र शासनच्या या योजनेची सांगोले नगपरिषदे मार्फत प्रभावी अंमलबजावणी सुरू असून घर बांधकाम पूर्ण करून अनुदान मागणी केलेल्या लाभार्थ्यांचे प्रलंबित अर्ज म्हाडा कार्यालयाकडे पाठपुरावा करत "सेवा पंधरवडा" अंतर्गत निकाली काढत 23 लाभार्थ्यांना नगरपरिषद मार्फत अनुदान वितरित करण्यात आल्याने 

आजअखेर एकूण 170 घरकुले पूर्ण झाली असल्याची माहिती मुख्याधिकारी श्री कैलास केंद्रे यांनी दिली.

या योजनेत पात्र लाभार्त्याला स्वतःच घर बांधण्यासाठी राज्य शासनाचे 1 लाख व केंद्र शासनाचे 1.5 लाख असे एकूण 2.5 लाख वितरित करण्याची तरतूद आहे. 

घराचे बांधकाम विविध टप्प्यावर असणाऱ्या लाभार्थ्यांनी निधी मागणी साठी केलेल्या अर्जांवर "सेवा पंधरवडा" अंतर्गत कार्यवाही करत नगरपरिषदेने घराचे बांधकाम पूर्ण झालेल्या एकूण 18 लाभार्थ्यांना 50,000 चा शेवटचा हफ्ता,4 लाभार्थ्यांना 40,000 चा तिसरा हप्ता आणि 1 लाभार्थ्यांस 60,000 चा दुसरा हप्ता वितरित करण्यात आला.

सांगोले नगरपरिषदेस प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत आज अखेर 4 सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) मध्ये एकूण 423 घरकुलांना शासनाकडून मंजूरी मिळालेली आहे. मंजूर घराकुलां पैकी 237 घरकुलांचे बांधकाम प्रगतीपथावर असुन, 170 घरकुलांचे बांधकाम पूर्ण झालेले आहेत. सदर योजनेची प्रभावी अंमलबजावणी करणेकामी मुख्याधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यालयीन अधीक्षक श्रीमती अभिलाषा निंबाळकर, शहर स्तरीय तांत्रिक कक्ष तज्ञ अमित बाबुराव कोरे कार्यरत आहे. 

आजअखेर घरकुल पूर्ण केलेल्या 170 कुटुंबाना शेवटचा हप्ता वितरीत केल्याने त्यांच्या स्वप्नातील घर साकार झाले असून सांगोला नगरपरिषद त्या सर्वांच्या आनंदात सामील आहे. अद्याप घर बांधकाम सुरू न केलेल्या लाभार्थ्यांनी लवकरात लवकर सुरुवात करून योजनेचा लाभ घ्यावा.

कैलास केंद्रे,मुख्याधिकारी,सांगोला नगरपरिषद

स्वतःच्या हक्काचे पक्के घर बांधण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेचा भरपूर फायदा होत आहे. मी माझ्या जमवलेल्या पैशातून बांधकामास सुरुवात केली आणि नगरपरिषदे कडून वेळोवेळी अनुदान मिळत गेले. आज मी माझ्या हक्काच्या घरात आनंदाने राहत आहे. मी शासनाचे आभार मानतो.

*नारायण भिमराव जाधव, (बांधकाम व्यवसाय), सांगोला*

Post a Comment

0 Comments