google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 दोन हजारांच्या नोटेबद्दल सरकारकडून धोक्याचा इशारा

Breaking News

दोन हजारांच्या नोटेबद्दल सरकारकडून धोक्याचा इशारा

 दोन हजारांच्या नोटेबद्दल सरकारकडून धोक्याचा इशारा

तुमच्याकडे दोन हजार रुपयांची नोट असेल , तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे . देशात बनावट नोटांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे . 2018 ते 2020 या कालावधीत जप्त करण्यात आलेल्या बनावट नोटांच्या संख्येत वाढ झाली आहे .

एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार , 2018 ते 2020 दरम्यान जप्त केलेल्या बनावट नोटांची संख्या वाढली आहे , अशी माहिती वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी लोकसभेत दिली . 


बनावट नोटांचे चलन रोखण्यासाठी हायक्वालिटी नेक इंडियन करन्सी नोट्सच्या तपासणीसाठी एनआयएला नोडल एजन्सी बनवण्यात आली आहे . FICN कोर्डिनेशन ग्रुप राज्यांच्या सुरक्षा एजन्सी आणि केंद्र सरकार यांच्यात गुप्त माहिती शेअर करण्यासाठी तयार करण्यात आला आहे . शिवाय , एनआयएमध्ये टेटर फंडिंग आणि फेक करन्सी सेलची स्थापना करण्यात आली आहे . जी टेटर फंडिंग आणि बनावट नोटांच्या प्रकरणांची चौकशी करते .


 भारत आणि बांगलादेश यांच्यात माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी आणि बनावट नोटांची तस्करीकरणाऱ्यांची ओळख पटवण्यासाठी एक संयुक्त टास्क फोर्स देखील तयार करण्यात आला आहे , असे चौधरी यांनी म्हटले . 2021-22 मध्ये देशात बनावट नोटांच्या संख्येत 10.7 टक्क्यांनी वाढ झाली आहे . 2021-22 मध्ये 500 रुपयांच्या 101.9 टक्के अधिक बनावट नोटा सापडल्या आहेत . दोन हजार रुपयांच्या बनावट नोटांच्या संख्येत 54.16 टक्क्यांनी वाढ झाली आहे .

Post a Comment

0 Comments