google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 करगणी : सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहित महिलेची गळफास घेत आत्महत्या ! पतीसह तीन जणांवर गुन्हा दाखल !

Breaking News

करगणी : सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहित महिलेची गळफास घेत आत्महत्या ! पतीसह तीन जणांवर गुन्हा दाखल !

 करगणी : सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहित महिलेची गळफास घेत आत्महत्या ! पतीसह तीन जणांवर गुन्हा दाखल !

करगणी : करगणी गावातील एका महिलेने घरातील मानसिक आणि शारीरिक त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे . गायत्री अतुल लांडगे ( वय 22 ) असे मयत महिलेचे नाव आहे . 


फिर्यादीनुसार , मयत महिला गायत्री हिचे लग्न झाले असून तीला तिचे पती , दीर , सासू , सासरे , जाऊ , यांनी माहेरून गलाई दुकानासाठी 2 लाख रुपये घेऊन ये म्हणून तसेच , दिराने तीला शारीरिक संबंध ठेव असे म्हणून या कारणावरून तीला शारीरिक आणि मानसिक त्रास दिल्याने या त्रासाला कंटाळून तिने तिच्या सासरच्या घरी स्वता : च गळफास घेत आत्महत्या केली . 


'दरम्यान , सदर प्रकरणी अतुल दाजी लांडगे ( नवरा ) , सागर दाजी लांडगे ( दीर ) , विमल दाजी लांडगे ( सासू ) , दाजी यशवंत लांडगे ( सासरे ) , वर्षा सागर लांडगे ( जाऊ ) ( सर्व रा . करगणी ) यांच्या विरुद्धात दत्तात्रय दिलीप रणदिवे ( वय 23 ) रा . देशमुख नगर यांनी आटपाडी पोलीस ठाण्यात फिर्याद नोंद केली आहे . तसेच सदर प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गोसावी करीत आहेत .

Post a Comment

0 Comments