शेकाप पक्ष संपला संपला म्हणणाऱ्याला शेकापक्ष कसा उभा राहतोय ते दाखवू गद्दारी , बेईमानी करणाऱ्यांचा बदला घेतल्याशिवाय शेकाप राहणार नाही : सरचिटणीस जयंत पाटील
सांगोला / प्रतिनिधी : शेकापक्ष संपला संपला म्हणणाऱ्याला शेकापक्ष कसा उभा राहतोय ते दाखवू असे सांगत ज्यांनी गद्दारी , बेईमानी आणि फसवणूकचे वर्तन केले आहे . त्याचा बंदला घेतल्याशिवाय शेकाप राहणार नाही .
विधीमंडळात प्रभावी अभ्यासपूर्ण काम केले तर काय होऊ शकते हे आपण आबासाहेबांच्या रूपाने सांगोला तालुक्यासारख्या दुष्काळी भागात पाहिले आहे . सांगोला तालुक्यात नंदनवन करण्याचे कॉम आबासाहेबांनी केले . सांगोलेकरांनी मानहानी थांबली पाहिजे असे सांगत घोडेबाजार आम्हाला माहित नाही , खिलाराचा बाजार माहित आहे . अशी टीका करत परिपुर्ण आता आपल्या सर्वांना विचार करण्याची वेळ आली आहे . शेकापक्षाकडे निष्ठेने पाहणार्या सांगोला तालक्यातील कार्यकर्त्यांचा मला अभिमान आहे ,
असे सांगत आबासाहेबांनी दिलेली प्रेरणा स्फुर्ती मी कधीही आयुष्यात विसरणार नसल्याचे शेकॉपचे सरचिटणीस भाई जयंत पाटील यांनी सांगितले . सांगोला सूतगिरणी येथे स्व.भाई . गणपतराव देशमुख यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त काल शनिवार दि . 30 जुलै रोजी भजन , पुष्पवृष्टी कार्यक्रम व शेतकरी मेळावा आयोजीत केला होता . शेतकरी मेळाव्याप्रसंगी भाई.जयंत पाटील बोलत होते . व्यासपीठावर शेकापक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते . पुढे बोलताना आ . भाई जयंत पाटील म्हणाले , विधीमंडळाचे बजेट हे आमदारांसाठी नसते तरजनतेसाठी असते . हे कोण मंत्री देत नाही तर सभागृह देते . सभागृहामध्ये व्यवस्थित मांडता आले तर मतदारसंघात कधीही पैसे कमी पडत नाही . सांगोल्याचा राजकारणात काही आमदार आज बोलतात . आमदार म्हणून मला बोलायला लाज वाटते .
असे सांगत हे पैसे सभागृह देत असते . मंत्री किंवा बाकी कोण देत नसतात . हे मिळविण्याची हिंमत , धमक आणि आवाका ज्या आमदारांमध्ये असतो . त्या त्या मतदारांसंघामध्ये निधी मिळू शकतो . ते आम्ही मिळविला असून तोआबासाहेबांनी मिळविला असून आबासाहेबांनी सभागृहाच्या कामकाजातून मोठ्यां प्रमाणात निधी आणला आम्ही कधी टीआरपी बघीतली नाही , आम्ही कधी पत्रकार बघितले नाहीत , आम्ही कधी मिडीयाबघीतली नाही .
आमची मिडीया जनतेच्या हृदयात आहे असे सांगत आज आपण कुठे चाललो आहे . काही जण झाडी बघत आहेत तर काही जण डोंगर बघत , ज्यांना डोंगर बघायचे आहेत त्यांनी अलिबागला या भरपूर डोंगर आहेत असे सांगत ही मतदारांची चेष्टा आहे . मतदारांची चेष्टा करून त्यांच्या मतांची किमंत केली जात असल्याची खंतही भाई जयंत पाटील यांनी यावेळी बोलून दाखविली .
मंत्रीपद , सत्ता नसताना केवळ विधीमंडळातील अभ्यासपूर्ण कामगिरीवर जोरावर , पंढरपूरहून आबासाहेबांनी सांगोल्याला पाणी आणले . मागेल त्याला काम या योजनेची अंमलबजावणी आबासाहेबांमुळे झाली असून सायकल घेण्याची कुवत नसणार्या तालुक्यात आज मसिर्डीज घेवून फिरतात हे केवळ
0 Comments