राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेतले 'हे' मोठे निर्णय
आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ बैठक पार पडली. या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह इतर नवनियुक्त मंत्री महोदय उपस्थित होते. यावेळी राज्यातील जनतेसाठी आणि शेतकऱ्यांसाठी अनेक मोठे निर्णय घेण्यात आले.
अतिवृष्टीचा फटका बसलेल्या नुकसानग्रस्तांना राज्य शासनाचा मोठा दिलासा. दोन ऐवजी तीन हेक्टर मर्यादेत मदत करणार.
शेतकऱ्यांचे झालेल्या नुकसानासाठी जी रक्कम NDRF कडून दिली जाते त्याच्या दुप्पट रक्कम दिली जाणार आहे.
कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मुंबई मेट्रो मार्ग-३ प्रकल्पाच्या सुधारित खर्चास मान्यता
रत्नागिरी येथे १०० विद्यार्थी क्षमतेचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यास मान्यता देण्यात आली आहे. तसेच ४३० खाटांचे जिल्हा सामान्य रुग्णालय उभारणीसाठी जागेची मुबलक उपलब्ध करून देणार.
मेट्रो ३ च्या वाढलेलय किमतीला आज मंजूरी देण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. या प्रकल्पाचा मूळ खर्च 23 हजार 136 कोटी होता तो आता 33 हजार 405 कोटी 82 लाख रुपयांचा होईल असे फडणवीस म्हणाले. या प्रकल्पाच्या वाढीव खर्चात केंद्र शासनाचा सहभाग मिळण्याकरिता देखील केंद्र शासनास विनंती करण्यात येत आहे. या प्रकल्पाची 85 टक्के कामे पूर्म झाली आहेत. तर कार डेपोचं काम 29 टक्के पूर्ण झालेले आहे अशी माहिती त्यांनी दिली.


0 Comments